एक्स्प्लोर

Aditya Thackeray : तिकडे पप्पूनं हादरवलं, इकडे एकट्या 'आदू बाळा'ने सरकारला सळो की पळो करून सोडलंय; आदित्य ठाकरेंचा थेट हल्लाबोल

Aditya Thackeray : मागील दोन दिवसांपासून आदित्य ठाकरे सतत सरकारवर हल्लाबोल करत आहे.

छत्रपती संभाजीनगर : मंत्र्यांच्या परदेशी दौऱ्यावरून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. दरम्यान, त्यांच्या याच टीकेला उत्तर देतांना भाजपचे नेते आशीष शेलार यांनी आदित्य यांचा आदूबाळ म्हणून उल्लेख केला होता. तर, आता शेलार यांच्या टीकेला उत्तर देतांना, 'तिकडे पप्पूनं हादरवलं, इकडे आदूबाळानं सळो की पळो केलंय, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

मागील दोन दिवसांपासून आदित्य ठाकरे सतत सरकारवर हल्लाबोल करत आहे. मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरून देखील आदित्य यांनी जोरदार टीका केली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून आदित्य यांच्यावर टीका करण्यात आली आहे. भाजप नेते शेलार यांनी आदित्य यांच्यावर टीका करतांना 'बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्‍याने दुसर्‍यांना शहाणपण शिकवायचे नसते असे म्हटले होते. यावर आता आदित्य यांनी उत्तर दिले आहे. 

काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

सरकारवर टीका करतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, एक पप्पूने यांना हलवून ठेवलं आहे. माझ्या नावात देखील बाळ लावले. पण माझ्या आजोबांच्या नावातील नावं असल्याने मला याचे अभिमान आहे. भाजपची ही नवीन भाषा आहे का? आम्ही ज्या भाजपला ओळखत होतो ती ही भाजप नाही. त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. माझ्या ट्वीटमुळे मंत्र्यांची परदेशवारी रद्द करावी लागली आहे. जनतेच्या पैशांवर यांनी मजा करू नयेत. तर, तिकडे पप्पूनं हादरवलं आणि इकडे आदूबाळानं सळो की पळो केलंय, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 

आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर...

आमदार आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. शहरात सुरु असलेल्या इंडियन असोसिएशन ऑफ टूर्स ऑपरेटर्स या संस्थेच्या 38 व्या वार्षिक परिषदेस आदित्य ठाकरे भेट देणार आहे. यासाठी आदित्य ठाकरे चिकलठाण विमानतळ येथे पोहचले असून, ते हॉटेल रामा इंटरनॅशनल येथील चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा शोध या विषयावर ते उपस्थितांशी संवाद साधणार असुन या चर्चासत्रात त्यांच्या समवेत प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, कृषी पर्यटन विकास संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक पांडुरंग तावरे व लेमन ट्रीचे अध्यक्ष विक्रमजीत सिंह सहभागी असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Uday Samant : ..म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परदेश दौरा रद्द; मंत्री उदय सामंतांनी सांगितलं कारण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget