Chandrapur News : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील कोरपनाचे तहसीलदार प्रकाश व्हटकर (Prakash Vatkar) यांना निलंबित करण्यात आलं आहे. कढोली-खुर्द येथील सरपंचाची अवैध निवड त्यांना भोवली आहे. याच प्रकरणात त्यांना राज्य सरकारने निलंबित केलं आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 12 ऑगस्ट 2024 रोजी कढोली-खुर्द चे सरपंच आणि एका सदस्याला अपात्र ठरवण्यात आलं होतं.


 तहसीलदारांच्या मनमानी कारभारामुळं राज्य सरकारचा मोठा निर्णय 


दरम्यान, या आदेशाविरुद्ध नागपूर विभागीय आयुक्त यांच्याकडे दाद मागण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार 26 ऑगस्ट रोजी नागपूर येथे सुनावणीचे पत्र तहसीलदार यांच्यासह संबंधित सर्वाना देण्यात आले होते. मात्र तहसीलदार व्हटकर यांनी सरपंच निवडीकरिता 26 ऑगस्ट 2024 रोजी सभा घेऊन काँग्रेसचे उमाजी आत्राम यांची सरपंचपदी निवड केली. तहसीलदारांच्या या मनमानी कारभाराची दखल घेत राज्य सरकारने प्रकाश व्हटकर यांना निलंबित केलं आहे.


महत्वाच्या बातम्या:


दोन आमदारांच्या वादात अधिकाऱ्यांचा बळी, कर्जतचे प्रांतअधिकारी आणि तहसीलदार निलंबीत