Chandrapur: जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेने सातवीच्या वर्गातील 17 विद्यार्थ्यांना बेदम फोडून काढल्याचा प्रकार घडलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत घडलेल्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षिकेने मारहाण केल्यानंतर दोन विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटल्याने सावली ग्रामीण रुग्णालयातही भरती करण्यात आल्याची माहिती आहे. 


दोषी शिक्षिकेवर कारवाईची मागणी


 या शिक्षिकेने सातवीच्या वर्गातील तब्बल 17 विद्यार्थ्यांना मारले असून यातील दोन विद्यार्थिनींवर सावली ग्रामीण रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत. चंद्रपुरातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील विषय शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या उज्वला पाटील या शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याने मुलींना त्रास झाला असून दोषी शिक्षिकेवर कारवाई करण्याची पालकांची मागणी आहे. माझ्या पिण्याच्या पाण्यात काहीतरी मिसळवले असा आरोप करत या शिक्षेकेने विद्यार्थ्यांना बेदम मारलं आहे.


मारहाणीचे कारण काय?


आपल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत काहीतरी मिसळल्याचा आरोप करत या शिक्षिकेने ही मारहाण केली असून  धनश्री हरिदास दहेलकर आणि लावण्या कुमदेव चौधरी या दोन विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर चंद्रपूर मधीलच सावली ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.  या मुलींच्या पालकांची या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी आहे.


जातपंचायतीचा विचित्र तिढा


सासऱ्यानं समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केल्याची शिक्षा आता सुनेला भोगावी लागतेय.सासऱ्याच्या प्रेमविवाहाचं खापर सुनेवर फोडत पुढील सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा धक्कादायक निर्णय  जातपंचायतीनं घेतल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. हा प्रकार 22 सप्टेंबर 2024 रोजी आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडला. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. मात्र महिलेच्या तक्रारीवरून 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. या निमित्ताने पुन्हा एकदा जात पंचायतीचा मुद्दा समोर आला आहे.


नक्की प्रकरण काय?


बीडमध्ये सध्या जातपंचायतीतले हे प्रकरण चर्चेचा विषय ठरला आहे. सासऱ्यानं समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला आणि त्याचीच शिक्षा सुनेला भोगावी लागत आहे. मालन फुलमाळी यांचे सासरे नरसु फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला होता. यांची जात तीरमाली आहे. सासू-सासर्‍याच्या मृत्यूनंतर 2017 मध्ये मालन फुलमाळी यांना जातीत सामावून घेण्यात आल. मात्र आता जातपंचायतीचा दंड न भरल्याचे कारण देत त्यांना पुन्हा एकदा बहिष्कृत करण्यात आलं. सध्या हे कुटुंब कडा कारखान्यावर वास्तव्यास आहे. आष्टी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असता तरी यातील आरोपींना अटक करून न्याय देण्याची मागणी पीडित कुटुंबाने केली आहे.


हेही वाचा:


Beed: सासऱ्याच्या प्रेमविवाहाचं खापर सुनेवर! पुढच्या 7 पिढ्यांना बहिष्कार टाकण्याचा जातपंचायतीचा निर्वाळा