चंद्रपूर : Artificial Intelligence म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हा आजच्या युगातील परावलीचा शब्द. मात्र याच Artificial Intelligence चा वापर करून चंद्रपूर जिल्ह्यात माणसांवर होणारे वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. 


राज्यातील सर्वाधिक जंगल आणि वन्यप्राण्यांची संख्या असलेला जिल्हा म्हणजे चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास 900 गावं ही जंगलव्याप्त म्हणजे जंगलालगत आहे. त्यामुळे वर्षभर गावांमध्ये पाळीव जनावरं आणि माणसांवर वन्यप्राण्यांचे हल्ले होत असतात. हा भाग कायम वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या सावटाखाली असतो. विशेषतः गेल्या काही वर्षात संरक्षणाचे उपाय चांगल्या प्रकारे राबविण्यात आल्याने जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे आणि त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष देखील तीव्र झालाय. गेल्या वर्षी तर चंद्रपूर जिल्ह्यात 50 लोकांचा वाघ-बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. मात्र हाच संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने आता Artificial Intelligence चा वापर करून जंगल आणि गावांमध्ये एक आभासी भिंत तयार केली आहे.


ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील सीताराम पेठ या गावात आभासी भिंतीचा हा अभिनव प्रयोग राबविण्यात आला आहे. या गावाभोवती 6 कॅमेरे वापरून संरक्षण भिंत तयार कऱण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मानव-वन्यजीव संघर्ष वाढल्याने मोठ्या प्रमाणात वनविभागाचं मनुष्यबळ आणि पैसा हा संघर्ष थांबविण्यासाठी खर्च होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या आभासी भिंती माणूस आणि वन्यप्राण्यांना एकमेकांपासून दूर ठेवण्यास मदत करतील अशी ताडोबा प्रशासनाला अपेक्षा आहे.


गावाच्या सभोवताल असलेल्या आभासी भिंतीच्या आत जंगली जनावर शिरताच एकीकडे वनविभागाला त्याची माहिती मिळते तर दुसरीकडे हूटर म्हणजे सायरन वाजल्यामुळे गावकरी देखील अलर्ट होतात. सायरन वाजताच ग्रामस्थ, शेतकरी आणि गुराखी ताततीने सुरक्षित जागेचा आश्रय घेतात.


Artificial Intelligence वापरून तयार करण्यात आलेल्या या आभासी भिंतीचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे ताडोबा प्रशासन लवकरच या प्रकारच्या आभासी भिंती चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष असलेल्या अनेक गावांमध्ये उभारण्याचा विचारात आहे.


चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास 900 गावं ही जंगलव्याप्त म्हणजे जंगलालगत आहेत. त्यामुळे वर्षभर या भागात पाळीव जनावरं आणि माणसांवर वन्यप्राण्यांचे हल्ले होत असतात. त्यामुळे हा भाग कायम वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या सावटाखाली असतो. विशेषतः गेल्या काही वर्षात संरक्षणाचे उपाय चांगल्या प्रकारे राबविण्यात आल्यानं जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात 50 लोकांचा वाघ-बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. हा गेल्या 10 वर्षातला उच्चांक आहे. उन्हाळ्यात तर संघर्ष अगदी शिगेला पोहोचतो. उन्हाळ्यात पाण्यांचे स्रोत आटल्यानं जंगली जनावरं गावाकडे वळतात आणि कळत-नकळत हल्ले होतात


ही बातमी वाचा: