Chandrapur News : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील एका धान खरेदी-विक्री संस्थेवर जवळपास पाच हजार क्विंटल धानाचे अपहार (five thousand quintals of paddy Scam) केल्याचा आरोप आहे. नागभीड तालुका शेतकी खरेदी-विक्री सहकारी संस्थेवर हा आरोप करण्यात आला आहे. या संस्थेची पणन महासंघामार्फत सध्या चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे आरोप करणारे गजानन पाथोडे भाजप नेते आहेत तर संस्थेचे मुख्य पदाधिकारी दिगंबर पाटील गुरपुडे हे काँग्रेस नेते आहेत.


पावसामुळं तांदळीचे नुकसान, मात्र विरोधकांचा अपहार झाल्याचा आरोप


पावसामुळे तब्बल पाच हजार क्विंटल तांदळाचे नुकासन झाल्याचे संस्थेनं म्हटलं आहे. मात्र पावसामुळं झालेल्या या नुकसानीवर संशय व्यक्त केला जात आहे. नागभीड तालुका शेतकी खरेदी-विक्री सहकारी संस्थेनं त्यांच्या गोदामात असलेला तांदूळ खराब झाल्याचा दावा केला आहे. या संस्थेने 2019 ते 2021 दरम्यान जवळपास एक लाख क्विंटल तांदूळ खरेदी केला होता. यातील पाच हजार क्विंटल तांदूळ पावसाने खराब झाल्याचं सांगितलं. सरकार दरबारी तशी नोंदही केली आहे. मात्र हा तांदूळ खराब झाला नसल्याचं सांगत विरोधकांनी त्याचा अपहार झाल्याचा आरोप केला आहे. 


सर्व आरोप राजकारणाने प्रेरित 


धान खरेदी-विक्री संस्थेने आपल्या जवळच्या म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या 7-12 वर मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदी केल्याचे दाखवले आहे. मात्र, प्रत्यक्षात ही तांदूळ खरेदी झालीच नाही. हे लपवण्यासाठी जवळपास पाच हजार क्विंटल धान पावसानं खराब झाल्याचं सांगण्यात आल्याचा संस्थेवर आरोप करण्यात आलाय. त्यासोबतच या धानावरचा बोनस मिळाला असल्याचा आरोपही करण्यात आलाय. मात्र हे सर्व आरोप राजकारणाने प्रेरित असल्याचे मत  संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.


आरोप-प्रत्यारोपांना राजकीय रंग 


दरम्यान, यासंदर्भात आरोप करणारे गजानन पाथोडे भाजपचे नेते आहेत. तर संस्थेचे मुख्य पदाधिकारी दिगंबर पाटील गुरपुडे हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळं या आरोप-प्रत्यारोपांना राजकीय रंग देखील आहे. मात्र, या आरोप-प्रत्यारोपामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये. तांदूळ खराब झाल्याची सरकार दरबारी नोंद करण्यात आलीआहे. मात्र हा तांदूळ खराब झाला नसल्याचं सांगत विरोधकांनी त्याचा अपहार झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, यामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या या संस्था मोडकळीस येऊ नये हीच अपेक्षा आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Mumbai Covid Scam: सनदी अधिकारी संजीव जैस्वालांच्या अडचणी वाढणार? ईडी छापेमारीत आढळल्या 15 कोटींच्या मुदत ठेवी