नवी दिल्ली: नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पीककर्जावरील व्याज केंद्र सरकारनं माफ  केलं आहे. आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने एकूण 660 कोटी रुपयांचं व्याज सरकारनं माफ केलं आहे.

नोटाबंदीनंतर सर्वाधिक जास्त फटका हा मजूर आणि शेतकरी वर्गाला बसला. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरण्यांसाठी सहकारी बँकांकडून अल्पमुदतीचे कर्ज घेतलं होतं. पण या काळातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करुन केंद्र सरकारने पीककर्जावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी यासंबंधी माहिती दिली.

याशिवाय आयआयएममधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा ऐवजी आता डिग्री, तर पदविका ऐवजी पदवी प्रधान करणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.