नागपूर: राज्यातील 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अनेक उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनसंपर्क सुरु केला आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी प्रचाराचे साहित्यही विक्रीसाठी बाजारात आले आहे.


आतापर्यंत प्रचारसाहित्यात टी-शर्ट, टोपी, हातगंडे याच वस्तू प्रामुख्यानं वापरल्या जात होत्या. मात्र, यंदाच्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी महिला वर्गाला समोर ठेवून नागपुरात अनेक विविध प्रकारचे प्रचार साहित्य आलंय. ज्यात चक्क एखाद्या पक्षाचे मंगळसूत्र, छल्ले, एप्रोन, पर्स, मोबाईल कव्हरदेखील बाजारात आले आहेत.

नागपुरातली अनेक दुकानं या अऩोख्या वस्तूंनी भरुन निघाले आहेत. महत्वाचं म्हणजे ही नामी शक्कल अनेक महिलांना आकर्षितही करते आहे.