मुंबई : दिग्दर्शक अब्बास आणि मस्तान ही जोडगोळी क्लासिक थ्रिलरपटांसाठी प्रसिद्ध आहे. याच दिग्दर्शकद्वयीच्या आगामी 'मशिन' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. परदेशातील लोकेशन्सवर शूट झालेल्या मशिनचा टीझर तितकाच नयनरम्य आहे.


अब्बास-मस्तानपैकी अब्बास बर्मावाला यांचा मुलगा मुस्तफा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'एमएस धोनी'फेम कायरा अडवाणी मुस्तफासोबत झळकणार आहे. गेल्याच आठवड्यात सिनेमाचे दोन पोस्टर रिलीज झाले होते. 'मशिन' येत्या 24 मार्चला रिलीज होणार आहे.

'क्लासिक लव्ह स्टोरी विथ अ ट्विस्ट' अशी सिनेमाची टॅगलाईन आहे. अब्बास-मस्तान यांचे खिलाडी, बाझिगर, अजनबी, 36 चायना टाऊन, रेस, रेस 2 यासारखे थ्रिलर सिनेमे प्रचंड गाजले आहेत. श्रवणीय संगीत आणि पार्श्वसंगीत हीसुद्धा अब्बास-मस्तान यांच्या चित्रपटांची जमेची बाजू असते. त्यामुळे नव्या चित्रपटाकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा आहेत.

पाहा टीझर :