Buldhana Crime News : बुलढाणा पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात उघडलेली मोहीम आणि त्यात सापडत असलेले मोठमोठे घबाड, यामुळे बुलढाणा जिल्हा हा गांजाचे भंडार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. लोणार , मोताळा आणि त्या पाठोपाठ आता मलकापूर तालुक्यातील भालेगाव येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क गांजाची लागवड केली. गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर ग्रामीण  पोलिसांनी भालेगाव येथील शेतकरी सुभाष खरे यांच्या शेतात धाड टाकली. या धाडीमध्ये चक्क तुरीच्या शेतात मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड व झाडे आढळून आली. पोलिसांनी (Buldhana Police) आतापर्यंत अठरा लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून या शेतकऱ्याला अटक केली आहे.


एका पाठोपाठ गांज्याच्या शेती उघड 


गेल्या काही दिवसांपूर्वी  बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात पोलिसांनी गांजाची शेती शोधून जवळपास दीड कोटी रुपयांचा गांजा जप्त करत मोठी कारवाई केली होती. त्यानंतर मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली गावात देखील अशीच एक कारवाई केली होती, ज्यामध्ये शेतकऱ्याच्या घरात गांजा आढळून आला होता. या कारवाईमध्ये शेतकऱ्याच्या घरातून तब्बल 40 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. या प्रकारातील तपास पुढे गेल्या नंतर लोणार, मोताळा आणि त्या पाठोपाठ आता मलकापूर तालुक्यातील भालेगावात देखील शेतात गांजाचा भंडार असल्याचे आढळून आले आहे. मलकापूर ग्रामीण पोलिसांनी भालेगाव येथील शेतकरी सुभाष खरे यांच्या शेतात धाड टाकली असता पोलिसांना तब्बल अठरा लाख रुपये किमतीचा गांजा सापडला आहे. पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात उघडलेली मोहीमेत सापडत असलेले गांजाचे घबाड बघता पोलीस देखील थक्क झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अजून किती ठिकाणी गांजाची लागवड केली असेल यांचा अंदाज पोलीस घेत आहे.  


बुलढाणा जिल्हात गांजाशेतीचा सुळसुळाट  


20 डिसेंबरलाच बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिंदखेड लपाली येथील एका शेतात शेतकाऱ्याने चक्क गांजाची लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या शेत शिवारात छापा घालून हे गांजाचे शेतच शोधून काढलं. त्यानानंतर पोलिसांनी शेतात असलेले घराची देखील झडती घेतली. या तपासात पोलिसांना घरातून जवळ जवळ 40 किलो गांजा आढळून आला होता. या घटनेच्या काही दिवसाआधी लोणार तालुक्यात हत्ता शिवारात तुरीच्या शेतात गांजा लागवडीची घटना उघडकीस आली होती. सतत सापडून येणाऱ्या या धक्कादायक घटनांमुळे  बुलढाणा जिल्हा हा गांजाचा भंडार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या प्रकरणी पोलीस देखील सतर्क राहून शोध मोहीम राबवत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अजून किती घटना उघडकीस येणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: