Buldhana Crime News :  गेल्या आठवडाभरापूर्वीचं लोणार तालुक्यात पोलिसांनी गांजाची शेती शोधून जवळपास दीड कोटी रुपयांचा गांजा जप्त करत कारवाई केली होती. ही घटना ताजी असतानांच आता मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली गावातील शेतकऱ्याच्या घरात गांजा आढळून (Buldhana Crime News) आला आहे. गोपाल मुंडाळे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याच्या घरातून तब्बल 40 किलो गांजा  पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी शेतकऱ्याला अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे.  


शेतकऱ्याच्या घरात सुद्धा सापडला 40 किलो गांजा


बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिंदखेड लपाली येथील एका शेतात शेतकाऱ्याने चक्क गांजाची लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या शेत शिवारात छापा घालून हे गांजाचे शेतच शोधून काढलं. त्यानानंतर पोलिसांनी शेतात असलेले घराची देखील झडती घेतली. या तपासात पोलिसांना घरातून जवळ जवळ 40 किलो गांजा आढळून आला. गोपाल मुंडाळे असे या शेतकऱ्यांचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. काल, 20 डिसेंबरच्या  सायंकाळी पोलिसांनी छापा मारून हा प्रकार उघडकीस आणला. गेल्या आठवडाभरापूर्वी लोणार तालुक्यात हत्ता शिवारात तुरीच्या शेतात गांजा लागवडीची घटना उघडकीस झाली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आणखी किती ठिकाणी गांजा लागवड करण्यात आली आहे, असा प्रश्न यानिमित्याने पुन्हा उपस्थित होतो आहे.  


भारतात गांजावर पूर्णपणे बंदी


भारतात गांजावर पूर्णपणे बंदी आहे. तरीही लोक छुप्या पद्धतीने याची लागवड करतात. काहीजण व्यापार देखील करतात. त्याचे सेवन करतात. अशाप्रकारे, आपल्या देशात हजारो वर्षांपासून गांज्याचं सेवन केलं जातं. वर्ष 1985 पर्यंत गांजावर कुठल्याही प्रकारची बंदी नव्हती, पण राजीव गांधी यांच्या सरकारने 1985 मध्ये एनडीपीएस कायदा आणला. या कायद्यानुसार गांजावर बंदी घातली गेली. गांजाबद्दल बर्‍याच गोष्टी बोलल्या जातात. एकीकडे गांजाचे तोटे सांगणारे लोक आहेत तर त्याचे फायदे सांगणार्‍यांचीही संख्या बर्‍यापैकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात गांजावरील बंदी हटविण्याची मागणी होत आहे. काही वेळेला तर शेतकऱ्यांनी गांज्याची लागवड करण्याची सरकारनं परवानगी द्यावी अशी देखील मागणी केली आहे. तर अनेकदा शेतकरी नेत्यांनी देखील शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. 


 


महत्त्वाच्या बातम्या: