एक्स्प्लोर

लालच बुरी बला... सेवानिवृत्तीच्या 1 महिना आधीच तलाठ्याला लाच घेताना अटक; ACB कडून दोघांना बेड्या

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तहसील कार्यालयात वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्यास अटक.

बुलढाणा : सरकारी नोकरीत लागण्यापूर्वी आपण शेतकऱ्याची (Farmer) पोरं म्हणून भूषणावह सांगणारे, जेव्हा सरकारी अधिकारी बनतात तेव्हा शेतकऱ्यांनाच वेठीस धरतात असे अनेकदा पाहायला मिळालं आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करुन त्यांना विविध कामासाठी पैशांची मागणी होत असते. काही दिवसांपूर्वी ग्रामसेवक आणि महसूल कर्मचारी लाच (Bribe) घेताना अटक करण्यात आल्याचे पाहायला मिळालं. आता, बुलढाणा जिल्ह्यातही एका तलाठ्यासह महसूल कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे. रावसाहेब काकडे असे तलाठी महाशयांचे नाव आहे, विशेष म्हणजे पुढच्याच महिन्यात त्यांची सेवानिवृत्ती होणार होती. मात्र, तत्पूर्वीच एसीबीने (ACB) अटक केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तहसील कार्यालयात वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी व महसूल सहाय्यक असं दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. तलाठी रावसाहेब काकडे व महसूल सहाय्यक मनोज झिने अशी लाचखोरांची नावे असून यातील तलाठी रावसाहेब काकडे याची सेवानिवृत्ती अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. मात्र, पोलिसांनी रंगेहात धाड टाकत तलाठी महोदयांना अटक केली असून लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, शासकीय सेवेतील इतर भत्ते आणि सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यापासून हे महाशय वंचित राहू शकतात. 

पिक विम्यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

परभणी जिल्ह्यात खरीप 2024 मध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. याबाबत पिक विमा अद्यापही असंख्य शेतकऱ्यांना मिळालेला नाही, या संदर्भात नेमण्यात आलेली आयसीआयसीआय लोम्बार्ड पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. या संदर्भात कंपनीकडून ना खुलासा केला जात आहे, ना उर्वरित पिक विमा देत आहे. त्यामुळे तात्काळ या कंपनीला काळ्या यादीत टाकून शेतकऱ्यांना पिक विमा देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जोरदार ठिय्या आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर घोषणाही देण्यात आल्या आहेत. जर लवकरात लवकर पिक विमा मिळाला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. 

हेही वाचा

माळेगाव कारखाना निवडणुकीत तावरेंना पहिलं यश; महिला गटातून अजित पवारांना 'दे धक्का'

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime News: डॉ. गोपाल सोनी यांच्या मृत्यूने खळबळ; रात्री एकटेच शेतात गेले, 2 तासानंतर मृत अवस्थेत आढळले!
डॉ. गोपाल सोनी यांच्या मृत्यूने खळबळ; रात्री एकटेच शेतात गेले, 2 तासानंतर मृत अवस्थेत आढळले!
Harshwardhan Sapkal and Devendra Fadnavis: 'सगळं ज्ञान आमच्याकडेच, आम्ही सोडून सगळे निर्बुद्ध'; देवेंद्र फडणवीसांचा अहंकार विशिष्ट विचारांचे प्रतिनिधित्व करणारा: हर्षवर्धन सपकाळ
'सगळं ज्ञान आमच्याकडेच, आम्ही सोडून सगळे निर्बुद्ध'; देवेंद्र फडणवीसांचा अहंकार विशिष्ट विचारांचे प्रतिनिधित्व करणारा: हर्षवर्धन सपकाळ
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
Vidarbha Rain Deficit : मुंबई-पुण्यात पुरेपूर; मात्र नागपूरसह विदर्भातील 11 पैकी 8 जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट; मराठवाड्यातील धाराशिवही तहानलेलाच!
मुंबई-पुण्यात पुरेपूर; मात्र नागपूरसह विदर्भातील 11 पैकी 8 जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट; मराठवाड्यातील धाराशिवही तहानलेलाच!

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget