Buldhana Rain : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात रात्री पुन्हा अतिवृष्टी झाली आहे. या पावासामुळं (Rain) अनेक नद्यांना ओढ्यांना पूर आला आहे. या स्थितीमुळं नागरिकांना जीव मुठीत धरुन रात्र काढल्याचं चित्र  पाहायला मिळालं. आलेवडी गावात पुराचं पाणी शिरल्याने अनेक घर जलमय झाली आहेत. आलवाडी ग्रामपंचायत इमारतीत दोन ते तीन फूट पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे. तर काही कुटुंबाचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.  


संग्रामपूर परिसरात सातपुडा डोंगर परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसानं कहर केला आहे. तालुक्यातील पांडव नदीसह अनेक ओढ्यांना पूर आला आहे. नदीला पूर आल्यामुळं शेगाव-जळगाव-जामोद हा मार्ग काही काळ बंद होता. तर आलेवडी गावात पुराचं पाणी शिरल्यानं अनेक घरं जलमय झाली आहेत. आलवाडी ग्रामपंचायत इमारतीत दोन ते तीन फूट पाणी शिरल्याने मोठ नुकसान झालं आहे. 


संग्रामपूर आणि जळगाव जामोद या तालुक्याला मोठा फटका


बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद या तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे. 1960 नंतर पहिल्यांदाच इतका मोठा पाऊस या दोन्ही तालुक्यात बरसला आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकतीच पेरलेली पीकं पाण्याखाली गेली आहेत. अनेकांच्या शेत जमिनी वाहून गेल्या आहेत


राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी 


सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह उपनगर ठाणे पालघर परिसरात जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच राज्यातील कोकणसह विर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. पाहुयात आज कोणत्या विभागात कोणता अलर्ट देण्यात आला आहे. 


या भागात पावसाचा अंदाज 


हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर ठाणे जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तसेच गोंदिया जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. त्याचबरोबर सिंदुधुर्ग, कोल्हापूर, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर विदर्भात यलो अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज