बुलढाणा : मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी इथे पांडुरंग मगर या युवा शेतकऱ्याने गेल्या तीन वर्षापासून मधमाशी (Honey Bee)  पालनाचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या शेतात घुसून अज्ञातांनी मधमाशांच्या 125 पेट्यांमध्ये रासायनिक कीटकनाशक टाकलं, यात अडीच कोटी मधमाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात (Buldhana News) घडली आहे. यामुळे मात्र पर्यावरणाची मोठी हानी झाली असून या शेतकऱ्याचही मोठे आर्थिक नुकसानही झालं आहे.


 दरवर्षी मगर यांना या व्यवसायातून दोन टनापर्यंत मध मिळत होता, वर्षाला साधारण दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळायचं. त्यांचं  मोठं आर्थिक नुकसान झालं आहेच सोबत पर्यावरणाचंही मोठं नुकसान या समाजकंटकांनी केलं आहे. या प्रकरणी पांडुरंग मगर यांनी मेहकर पोलिसात तक्रार दिली आहे.


उत्तर प्रदेश ,हिमाचल प्रदेश व बिहार येथून आणले मधमाशांचे बीज 


देऊळगाव माळी येथील पांडुरंग मगर या युवा शेतकऱ्याने गेल्या तीन वर्षापासून मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी शेतात जवळपास 125 पेट्यांमध्ये मधमाशा पाळल्या होत्या. त्यांची संख्या जवळपास अडीच कोटी एवढी होती. मगर यांनी उत्तर प्रदेश ,हिमाचल प्रदेश व बिहार येथून मधमाशांचे बीज आणले होते. या पेट्यांमधील मधमाशा जवळपास परिसरातील तीन किलोमीटर अंतरावरून फुलांमधील मध गोळा करून आणत असत आणि त्यामुळे दरवर्षी मगर यांना या व्यवसायातून दोन टनापर्यंत मध मिळत होतं व वर्षाला दहा लाख रुपयांचे उत्पन्न होत होतं .


अडीच कोटी मधमाशांचा मृत्यू


परंतु अज्ञातव्यक्ती ने या सर्व 125 पेट्यांमध्ये रासायनिक कीटकनाशक टाकल्याने मगर यांच्या शेतातील 125 पेट्यांमधील जवळपास अडीच कोटी मधमाशांचा मृत्यू झाला आहे.यामुळे मात्र पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. याप्रकरणी पांडुरंग मगर यांनी मेहकर पोलिसात तक्रार दिली आहे.


प्रशासनाने चौकशी करण्याची मागणी


पांडुरंग मगर म्हणाले, मी खादीग्राम एनबीबीचा अधिकृत सदस्य आहे. आम्ही आमचा मध चेतक फार्म्स या नावाने विदेशात पाठवण्याच्या तयारीत आहे.  मधविक्रीसाठी आवश्यक सर्व लायसन्स आम्ही काढले आहेत. तसेच मधमाशा पालनासाठी ज्या नोंदणी आवश्यक आहेत त्या सर्व आम्ही  पूर्ण केल्या आहेत. प्रशासनाने याची चौकशी करून आम्हाला शक्य तेवढी मदत करावी. 


हे ही वाचा :        


Bhandara Agriculture News: शाब्बास पठ्ठ्या! दहावी शिकलेल्या तरुणाची लाखोंची कमाई, पारंपरिक शेतीला फाटा देत केली आधुनिक शेती