बुलढाणा :  सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू आहे.  मुलीचे लग्न ऐन दोन दिवसावर आले त्यासाठी घरातील सर्वांची धावपळ सुरू होती.  लेकीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी घराबाहेर पडले. कुटुंबातील आनंदसोहळ्याला साक्षी होण्याचे निमंत्रण आप्त-मित्रांना देण्यासाठी जात असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. मुलीच्या लग्नाचा आनंद घेण्याअगोदरच वडिलांना जगाचा निरोप घ्यावा लागला.


मोताळा तालुक्यातील कुरहा गोतमारा येथील काशीराम मंझा हे आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून घरी परत येत असताना त्यांना बुलढाणा - मलकापूर (Buldhana News)  मार्गावरील एका वळणावर काल सायंकाळी ट्रकने धडक दिली आहे. यामध्ये काशिराम मंझा यांचा जागीच मृत्यू झाला.. मृतक काशिराम मंझा यांच्या मुलीच्या लग्नाची जोरदार तयारी चालू होती. लग्न ऐन दोन दिवसावर म्हणजे 27 एप्रिलला आहे. काशीराम मंझा मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून आपल्या दुचाकी वाहनाने परत येत असताना मुर्ती फाटा दरम्यान  बुलढाणाकडे जाणाऱ्या ट्रक आणि  मंझा यांच्या दुचाकीची भीषण धडक होऊन यामध्ये काशीराम मंझा यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे .


लाडक्या कन्येच्या लग्नाआधी पित्याच निधन ,समाजमन सुन्न


या भीषण धडकेत काशिराम मंझा हे जागीच ठार झाले. आपल्या लेकीच्या लग्नासाठी काशिराम हे जोरदार तयारी करत होते. मात्र, ऐन लग्नाच्या आदल्या दोन दिवसाआधी यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. आपले वडील गेल्यानं आणि कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानं संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. काशिराम मंझा यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा मोठा परीवार आहे. यामुळे मात्र समाजमन सुन्न झालं आहे.


याठिकाणी यापूर्वी ही झालेत अनेक अपघात


ज्याठिकाणी काशिराम यांचा अपघात झाला ते ठिकाण अपघात प्रवण ठिकाण म्हणून ओळखल्या जात काही वर्षांपूर्वी म्हणजे लॉकडाऊन काळात याच वळणावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या तिघांना अज्ञात ट्रकने उडविल होते त्यात तिघांचा मृत्यू झाला होता. सोलापूर - मलकापूर - बुऱ्हाणपूर महामार्गावर मोताळा मलकापूर दरम्यान या मार्गावर अनेक धोकादायक वळणे आहेत. ज्यात निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे , अशाच ठिकाणी आपल्या लेकीच्या लग्ना अगोदर बापाने जीव गमावला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Buldhana News: विवाहित महिलेवर अत्याचार करणाऱ्यांना दोघांना आजन्म कारावास, बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल