बुलढाणा : कोट्यावधी जिजाऊ भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंदखेड राजा (Sindhkhed Raja) येथील जिजाऊच जन्मस्थळ असलेला राजे लखोजी जाधव यांचा राजवाड्याची दूरवस्था (Buldhana News) झाली आहे. गेल्या वीस दिवसांपासून ही ऐतिहासीक वास्तू अंधारात असून येथील सीसीटिव्ही देखील गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने आता जिजाऊ भक्तांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे जिजाऊ यांचे जन्मस्थान आहे.सिंदखेड येथील ऐतिहासिक अशा राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात जिजाऊंचे जन्मस्थळ असल्याने कोट्यवधी जिजाऊ भक्तांच ते श्रद्धास्थान आहे. त्यामुळे रोज हजारो भक्त , पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. मात्र पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षमुळे या ऐतिहासिक स्थळाची पुरती दूरवस्था झाली आहे. परिसरात घाणीच्या साम्राज्यासह गेल्या वीस दिवसांपासून वीज पुरवठा बंद आहे. यामुळे हा राजवाडा अंधारात आहे तर येथील सीसीटिव्ही गेल्या महिनाभरपासून बंद आहे. ही वास्तू पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली असल्याने याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता जिजाऊ भक्तांमध्ये रोष निर्माण झाला आहे. येत्या आठवडाभरात याकडे लक्ष न दिल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा जिजाऊ भक्तांनी दिला आहे.
घाणीचे साम्राज्य
जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या पुरातन राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात मोठ्या प्रमाणात गवत उगवले असून परिसरात घाणीचे साम्राज्य बघायला मिळत आहे. रोज हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. मात्र साफसफाई नसल्याने या पुरातन वस्तूची दूरवस्था बघायला मिळत आहे. याबाबत नागपूर येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत आम्हाला कुठलीही माहिती नसल्याचं एबीपी माझाला फोनवरून सांगितल आहे.
राजे लखुजीराव जाधव यांच्या मुळेच सिंदखेडराजा हे नाव पडले याचे अनेक पुरावे सिंदखेडराजा येथे पाहायला मिळतात . त्यांच्या काळामध्येच किनगाव राजा , देवुळगाव राजा , मेहुना राजा , आडगाव राजा या गावांना सुद्धा जाधवांची पार्श्वभूमी लाभली आहे. ही सर्व गावे जाधव कालीन आहे . इतिहासामध्ये तसा पुरावा सुद्धा पाहायला मिळतो सिंदखेडराजा हे सत्तेचे मुख्य केंद्र होते येथून राजे लखुजीराव जाधव राज्य कारभार पाहत आहे.असे या शहराला ऐतिहासिक व आध्यात्मिक फार मोठा वारसा लाभला आहे राजमाता जिजाऊ या राजे लखुजीराव जाधव यांची मुलगी आहे जिजाऊ चे वडील राजे लखुजीराव जाधव यांच्या कार्यकर्तृत्वाच्या इतिहासाच्या पाऊल खुणा आजही सिंदखेडराजा येथे पाहायला मिळतात.
हे ही वाचा :