बुलढाणा :  शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, शिंदे गटातही आलबेल नसल्याचे चित्र आहे. बुलढाण्यातील शिंदे गटातील (Shiv Sena Shinde Faction) गटबाजी तीव्र झाली आहे. बुलढाण्याचे जिल्हाप्रमुख हे ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) जिल्हा प्रमुखासोबत ओल्या पार्ट्या करत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे.

  


बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिंदे गटातील सहा तालुक्यातील तालुकाप्रमुख आणि उपजिल्हाप्रमुख यांनी मुंबईत जाऊन वरिष्ठांना आणि मंत्री उदय सामंत यांना निवेदन दिल आहे. या निवेदनात,बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख शांताराम गाणे हे गटबाजीचे राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संघटना बांधणीसाठी त्यांच्याकडून अडचणी निर्माण केल्या जात आहे. शिवसेना ठाकरे  गटाच्या जिल्हा प्रमुखांसोबत ओल्या पार्ट्या करतात आणि त्यांच्यासोबत जवळीकही ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य शिवसैनिक संभ्रमात पडतात. त्यामुळे जिल्हा प्रमुख शांताराम दाणे यांना तात्काळ बडतर्फ करावं अन्यथा आम्ही सर्व उप जिल्हा प्रमुख , तालुका प्रमुख  व जिल्ह्यातील शिवसैनिक पक्षाचे काम बंद करणार आहोत असा इशाराही या निवेदनात दिला आहे. 


शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांच्या गटाने घेतलेल्या या पावित्र्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात शिवसेनेत मोठी गटबाजी बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रमुख शांताराम दाणे हे खासदार प्रतापराव जाधव यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. या बंडामुळे जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


खासदार जाधव म्हणतात...


शिवसेना शिंदे गटातील या वादाबाबत खासदार प्रतापराव जाधव यांनी म्हटले की, हे पेल्यातील वादळ होते अन् आता पेल्यातच संपेल असे त्यांनी म्हणत अधिक भाष्य केले नाही. 


शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला धक्का, विश्वासू माजी आमदाराने साथ सोडली!


 शिंदे गटात (Shinde Camp) प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असताना, आता शिंदे गटाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा (Pandurang Barora) यांनी शिवसेनेला (Shiv Sena) जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. पांडुरंग बरोरा गुरुवारी 19 ऑक्टोबरला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Sharad Pawar NCP) प्रवेश करणार आहेत.  पांडुरंग बरोरा यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार चाचपणी सुरु केल्याची चर्चा आहे. लवकरच शरद पवार हे शहापुरात जाहीर सभा घेणार आहेत.