Buldhana News: बुलढाणा : बुलढाणा जिल्हा (Buldhana District) केंद्रीय सहकारी बँक (Buldhana District Central Cooperative Bank) ही शेतकऱ्यांची पाठीराखी आणि विश्वासू म्हणून ओळखली जाते. शेतकऱ्यांच्या अडल्यानडल्या काळात याच बँकेनं शेतकऱ्यांना आधार दिला आहे. मात्र अलिकडच्या काळात आणि दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही बुलढाणा जिल्हा बँक प्रशासनाकडून शेतकऱ्यांसोबत दगा फटका केला जात असल्याची भावना कर्जदार शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्याला कारण ठरलं आहे, सातबारावर (Satbara) जप्ती बोजा चढवल्याच्या नोंदी. या नोंदी करत बँकेनं विश्वासघात केल्याच्या भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्या आहेत. 


सर्व बँका पीक कर्ज घेतल्यानंतर शेतकऱ्याच्या जमिनीवर म्हणजेच 7/12 उताऱ्यावर बोजा चढवतात. सातबारावर जप्ती बोजा चढवल्याच्या नोंदी करून बँकेनं शेतकऱ्यांचा विश्वास तोडण्याच्या भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. या प्रकारामुळे दीड लाख रुपयांचे किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम थकीत असलेले 2500 ते 3000 कर्जदार शेतकरी चांगलेच हादरले असून सरकारनं यात लक्ष द्यावं आणि दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांना तारावं, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.


मात्र आम्ही जप्ती बोजा चढविण्याच्या प्रक्रिया या अनेक दिवसांपासून सुरू केल्या होत्या, पण त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं आम्ही सध्या या कारवाईला स्थगिती दिली आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांना अशा नोटीसा गेलेल्या आहेत, केवळ त्यांच्याच सातबारावर बोजा चढला गेला आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेंचे प्रशासक खरात यांनी दिली आहे. 


बँकेकडून करण्यात आलेल्या प्रक्रियेवर स्वाभामिनी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. आधी धनाढ्य आणि राजकीय आणि लोकप्रतिनिधींना दिलेलं कर्ज वसूल करा आणि मगच शेतकऱ्यांकडे कर्ज वसुली करा, अन्यथा कर्ज वसुली अधिकाऱ्यांना बदडून काढू, असा इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Crop Insurance Scam : कुठे एमआयडीसीच्या जागेवर, तर कुठे शेतच नसतानाही भरला विमा; कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच पीक विमा घोटाळे