एक्स्प्लोर

Buldhana Crime News: उत्तर आलं नाही; शिक्षक रागावले, घरी सांगतो म्हणाले अन्...; दहावीच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, नोट लिहली, घटनेनं बुलढाणा हादरलं

Buldhana Crime News: उत्तर देता न आल्याने शिक्षकांनी त्याला रागावले व तुझ्या आई-वडिलांना मी सांगेन असं म्हटलं यावरून मधल्या सुट्टीत विनायकने गावाजवळीलच शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.

बुलढाणा: बुलढाण्यात वर्ग शिक्षकाने रागवल्याच्या कारणावरून दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या (Buldhana Crime News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्याने जीवन संपवण्याआधी "सुसाईड नोट" लिहली आहे. या घटनेने बुलढाण्यात हळहळ व चिंता व्यक्त केली जात आहे. वर्ग शिक्षकाने वर्गात काही प्रश्न विचारले असता उत्तर आले नाही. त्यावरून वर्ग शिक्षक रागावले व तुझ्या आई-वडिलांना तू अभ्यास करत नाही, हे मी सांगेन असं म्हणत रागावल्याच्या कारणावरून दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सुसाईड नोट (Buldhana Crime News) लिहीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत विद्यार्थी विनायक महादेव राऊत (वय 15, रा. वसाडी बु.) हा जय बजरंग विद्यालयात दहावीमध्ये शिक्षण घेत होता. (Buldhana Crime News)

नेमकं काय घडलं?

नांदुरा तालुक्यातील वसाडी गावातील जय बजरंग विद्यालयात ही धक्कादायक व तितकीच चिंता वाढविणारी घटना घडली आहे. नुकत्याच शाळा सुरू झाल्या व वसाडी गावातील जय बजरंग विद्यालयातील विद्यार्थी विनायक महादेव राऊत हा दहावी शिकत होता. काल शाळेत शिक्षकांनी वर्ग सुरू असताना विनायकला अभ्यासाबद्दल काही प्रश्न विचारले. मात्र त्याबद्दल त्याला उत्तर देता न आल्याने शिक्षकांनी त्याला रागावले व तुझ्या आई-वडिलांना मी सांगेन असं म्हटलं यावरून मधल्या सुट्टीत विनायकने गावाजवळीलच शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोटही लिहीली. यामध्ये सुर्यवंशी या वर्ग शिक्षकाने मला रागवले, आई-वडिलांवरूनही बोललेत त्यामुळे मी फाशी घेत आहे, असं लिहिलं आहे . या घटनेमुळे जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे व चिंता ही व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांनी मर्ग दाखल केला असून संबंधित सूर्यवंशी नावाच्या शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे.विनायकने आपलं जीवन संपवण्याआधी त्यामागं काय कारण आहे, त्याबाबतची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. खिशात सापडलेल्या चिठ्ठीत शिक्षक सूर्यवंशी यांनी मानसिक छळ केला, तसेच त्याच्या पालकांविषयी अपशब्द वापरून अपमान केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाला विचारला जाब

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत शिक्षकाला जाब विचारला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शिक्षक सूर्यवंशींना ताब्यात घेतले आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, संबंधित 3 शिक्षक यापूर्वीही अशाच प्रकारे गैरवर्तन करत होते. त्याविरोधात तक्रार करूनही केवळ बदली करून पुन्हा वसाडी येथेच नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, IMDचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान विभागाचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
बुलढाण्यात धक्कादायक घटना, नदीत पाय घसरुन पडल्यानं 55 वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू
बुलढाण्यात धक्कादायक घटना, नदीत पाय घसरुन पडल्यानं 55 वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget