बुलढाणा: बुलढाण्यातील अपघातात मृत पावलेल्या एका भिक्षुकाकडे  लाखो रुपयांचे घबाड सापडले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात डोणगाव रोडवर (Buldhana News)  सायकलस्वार भिक्षुकाला अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात भिक्षुक गंभीरित्या जखमी झाला होता. त्याला सुरुवातीला मेहकर येथील स्थानिक रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. पण पुढील उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आले. तिथे उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला या अपघातात भिक्षुकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्याकडे पैसे सापडले. एवढी मोठी रक्कम एका भिक्षुकाकडे पाहून पोलीस चक्रावून गेले आहेत.  


बुलढाण्यातील मेहकर येथील शासकीय रुग्णालयाजवळ परवा एक इसम सायकलच्या धडकेत गंभीर जखमी झाला होता. पोलिसांना ही माहिती मिळताच या इसमाला पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळीया इसमासोबत एक थैली होती. अपघातात मृत्यूमुखी पडलेला हा भिक्षुक कोण आहे?  याचा तपास घेण्यासाठी अपघातस्थळी पोलिसांनी त्या थैलीत पोलिसांना आधार कार्ड सापडले. या आधार कार्डच्या मदतीने पोलसांना त्याच्या नातेवाईकांपर्यंत पोहचणे शक्य झाले. 


एक लाख 63 हजार रुपये सापडले


 या भिक्षुकाचे नाव   दीपक बाबुराव मोरे आहे.  48 वर्षे वय असून  अंजनी मेहकर येथे राहत असल्याचे समोर आले. त्या भिक्षुकाकडे सापडलेल्या थैलीत काही कागदपत्रे , चेकबुक आणि एक लाख 63 हजार रुपये नगद रक्कम मिळून आली. पोलिसांनी  या इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेऊन ही रक्कम व कागदपत्रे नातेवाईकांच्या स्वाधीन केले . यावेळी मात्र पोलिसांनाही गहिवरून आलं होतं. धनत्रयोदशीच्या दिवशी नातेवाईकांना रक्कम देण्यात आली.  पैसे सुपूर्द करताना नातेवाईकांसह पोलिसांनाही गहिवरुन आले.


पोलीस  गेले चक्रावून


भिक्षुकाजवळ सापडेलल्या थैलीत  एवढी रक्कम पाहून पोलीस चक्रावून गेले. भिक्षुकाजवळ एक पिशवी आढळून आली.या पिशवीतून तब्बल एक लाख 63 हजार रुपये नगदी स्वरूपात पोलिसांना मिळून आले. याशिवाय चिल्लर, विविध बँकेची पासबुक, एटीएम कार्ड आणि पॅन कार्ड देखील आढळून आले आहे. एवढे पैसे भिक्षकुकाडे कसे आले? याचा तपास पोलीस करत आहे.


हे ही वाचा :


Pune Crime News : फुटपाथवर झोपण्यावरुन दोघांमध्ये वाद; डोक्यावर, हातावर वार करून 75 वर्षीय फिरस्त्याची हत्या


Pune Crime News : पुणे हादरलं! तू इथे का थांबलास? असं म्हणत टोळक्याकडून बेदम मारहाण अन् छातीत चाकू भोकसून हत्या