पुणे : पुण्यात हत्या, गुन्हेगारी आणि खंडणीच्या (Pune Crime News) घटनेत वाढ झाली (pune murder) आहे. त्यातच क्षृल्लक कारणावरुन झालेल्या वादातून देखील हत्या केल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. फुटपाथवर झोपण्याच्या वादातून 75 वर्षीय फिरस्त्याचा धारदार (Pune Crime News) हत्यारांनी वार करून खून करण्यात आला आहे. काल साडेदहा वाजण्याच्या सुमारास खडकी रेल्वे स्टेशनकडे  जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला ही घटना घडली आहे. 


मंगेश भागाजी भद्रिके  (वय 75, रा. खडकी रेल्वे स्टेशन फुटपाथ) असे  खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विकास रामचंद्र गायकवाड (रा. खडकी बाजार चौपाटी, खडकी) याला अटक करण्यात आली आहे. तर, पोलीस उपनिरीक्षक अण्णा बादशाह गुंजाळ यांनी फिर्याद दिली आहे. गायकवाड आणि भद्रिके हे फुटपाथवर राहतात. या दोघांमध्ये फुटपाथवर झोपण्यावरून वाद झालेला होता. त्यावेळी गायकवाड याने दारू पिऊन येऊन धारदार हत्याराने भद्रिके यांच्या डोक्यावर, पाठीवर, हातावर वार करून त्यांचा खून केला.


हत्येचं सत्र सुरुच...


पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत अंधारात थांबलेल्या तरुणाला 'तू इथे का थांबलास?' अशी विचारणा करत चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर, तरुणाच्या छातीत चाकू भोकसून हत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा शेळके असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडलेली आहे. कृष्णा इतर दोन मित्रांसह थांबला होता. यावेळी चार आरोपी आणि कृष्णासह त्याच्या मित्रांचा वाद झाला, यातूनच कृष्णाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकारामुळे काही वेळ महामार्गाच्या परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. 


क्षृल्लक कारणावरुन हत्या


सध्या पुण्यात क्षुल्लक कारणावरुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहेत. क्षुल्लक कारणावरुन भांडणं होतात, त्याच्या रागातून खून आणि हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याबरोबरच बलात्कार, सायबर क्राईम आणि लैंगिक छळांच्या घटनेत देखील वाढ होत आहे. कोयता गँग आणि चुहा गँग सक्रिय आहेत. त्यातील कोयता गँगने सध्या पुण्यात धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता पुण्यात एकापाठोपाठ एक क्षृल्लक कारणावरुन हत्या केल्याचं समोर येत आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या :


Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराची हत्या, चार जणांना अटक