Maharashtra Buldhana News: बुलढाणा : गेल्या 22 दिवसांपासून राज्यभरातील 70 हजार अशा स्वयंसेविका संपावर असल्यानं याचा फटका ग्रामीण आणि आदिवासी भागातील गर्भवती महिला आणि बालकांना बसत आहे आणि यामुळे मात्र ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णतः ठप्प झालेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात गेल्या 22 दिवसांत 18 महिलांची प्रसूती धोकेदायकरित्या घरी किंवा जंगलात झाल्याच धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.


ग्रामीण भागांत आरोग्य व्यवस्था आणि जनतेचा दुवा असणाऱ्या आशा स्वयंसेविका या गेल्या 22 दिवसांपासून संपावर आहेत. एक अशा स्वयंसेविका ही 1000 लोकसंख्येत काम करते, त्यामुळे ग्रामीण भागांत गर्भवती महिला आणि लहान मुलांचे लसीकरण या महत्त्वाच्या मुद्द्यावर या आशा स्वयंसेविका काम करत असतात. आजच्या महागाईच्या काळात फक्त प्रवास भत्ता देऊन 25 ते 30 गावातील लेखाजोखा ठेवण्याचं काम या अशा स्वयंसेविकांना देण्यात येतं. अशा स्वयंसेविका या आरोग्य व्यवस्था आणि सामान्य जनतेमधील दुवा असल्यानं खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. परंतु, गेल्या 22 दिवसांपासून राज्यभरातील 70000 अशा स्वयंसेविका संपावर असल्यानं याचा फटका ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना आणि लहान मुलांना बसत आहे तर लसीकरण पूर्णतः ठप्प आहे. 


या आहेत बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी पाड्यातील निकिता उमेश भोसले यांचे काल रात्री प्रसूती झाली मात्र यांचे प्रस्तुती जंगलात झाली. अनेकदा फोन करूनही आशा स्वयंसेविका न आल्याने या आदिवासी परिवाराला या महिलेची प्रसूती जंगलातच करावी लागली नशीब बलवत्तर म्हणून बाळ आणि बाळंतीण दोन्ही सुखरूप आहेत मात्र अद्यापही या महिलेला कुठलीही वैद्यकीय मदत मिळालेली नाही अशाच प्रकारच्या अनेक महिला संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात प्रसूती झालेल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही आदिवासी तालुक्यात गेल्या 22 दिवसात 18 महिलांची प्रसूती ही जंगलात किंवा आदिवासी पाड्यात घरीच झालेली आहे.


तर या आहेत बुलढाणा जिल्ह्यातील मालठाणा गावच्या सीमा पवार तीन दिवसापूर्वीच यांची प्रसूती घरीच झाली अनेकदा आशा व स्वयंसेविकांना फोन करूनही व रुग्णवाहिकेला फोन करूनही यांना कोणतीही मदत न मिळाल्याने यांची प्रसूतीही आदिवासी पाड्यावरील जंगलात झाली तर प्रसूती झाल्यानंतरही बाळ किंवा आईला कुठल्याही प्रकारच्या औषधोपचार अद्यापही झालेला नाही.


मात्र गेल्या 22 दिवसापासून संपावर असलेल्या आशा स्वयंसेविका या आपल्या संपावर ठाम आहेत सरकार आम्हाला फक्त तात्पुरता प्रवास भत्ता देतो आणि आमच्याकडून अनेक गावांची काम करून घेतो परंतु आमच्या कामाची दखल न घेतल्याने आम्हाला संपाचा हत्यार हाती घ्यावे लागलं अशी भावना आशा स्वयंसेविकांची आहे.


राज्यभरात तर हजार आशा स्वयंसेविका संपावर आहेत तर NRHM चे  अनेक कर्मचारी संपावर आहेत. आणि त्यामुळे याचा फटका ग्रामीण भागातील आणि आदिवासी पाड्यावरील गर्भवती महिला व लहान मुलांना बसत आहे मात्र यावर कुठलाही तोडगा न निघाल्याने याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे.