बुलढाणा:   गुरु  आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासण्याचे काम बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana News) एका शिक्षकाने केला आहे. जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकाला पॉस्को (Posco) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. बुलढाण्यात  हा धक्कादायक प्रकार (Buldhana Crime News) उघडकीस आला आहे. 


 बुलढाण्यातील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शिक्षक सतीश विक्रम मोरे याच्यावर पोक्सो सह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी शिक्षक हा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून त्याने आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर स्वतःच्या बोलेरो कारमध्ये वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. या संतापजनक घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


नराधाम शिक्षकाला अटक


दरम्यान शिक्षकाच्या या गैरवर्तणुकीला कंटाळलेल्या या विद्यार्थीनींनी या शिक्षकाच्या सुरू असलेल्या कारनाम्याची तक्रार पालकांकडे आले.  या नंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारा संतापजनक प्रकार या तक्रारींमधून समोर आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीसांनी नराधाम शिक्षकाला अटक केली आहे.  


विद्येचं दान देणाऱ्या शाळेतच एका नराधम शिक्षकाकडून अत्याचार


राज्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. त्यातच अनेक प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलींना देखील नराधम आपली शिकार बनवत आहेत. यात पवित्र समजलं जाणारं गुरु शिष्याचं नात देखील बदनाम होत चाललं आहे. विद्यादानाचं काम करणाऱ्या शिक्षकांकडून आपल्या विद्यार्थिनींना वासनेचं शिकार बनवत असल्याचा घटना समोर येत असल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. आता बुलढाण्यातील या घटनेनं पुन्हा संतापाची लाट परसली आहे.


शिक्षकच हैवान?


 शिक्षणासाठी पालक शिक्षकांवर विश्वास ठेवून आपले पाल्य शिक्षकांकडे किंवा शाळेत पाठवतात. मात्र शिक्षकानेच असं कृत्य केल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि शिवाय पालकंही शिक्षकाच्या कृत्यावर संताप व्यक्त करत आहेत. पुण्यातील अनेक शाळांमधून अशा घटना समोर येत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.अशा अनेक घटना रोज घडत असल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवाय महिला असुरक्षित असल्याने त्यांच्या मनातही धास्ती निर्माण झाली आहे. पैशाचं किंवा नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार केले जात आहे. शिवाय त्यांचे अश्लील व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे महिला हा छळ सहन करताना दिसत आहे तर काही महिला या विरुद्ध आवाज उठवताना दिसत आहेत.