Mumbai News : भारत सरकारच्या 'इंस्टिट्यूशन ऑफ एमिनेन्स'चा दर्जा प्राप्त करणाऱ्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या बिटस् (BITS) पिलानीने गुरुवारी (9 मार्च) मुंबईत बिटस् लॉ स्कूलच्या ( BITS Law School ) माध्यमातून कायदेविषयक शिक्षण सुरु करत असल्याची घोषणा केली. द न्यू एज बिटस् लॉ स्कूलने कायदेशीर शिक्षणाच्या सर्व पैलूंची अभिनव पद्धतीनं पुर्नकल्पना करत रचना केली आहे. त्यात लवचिक पद्धतीनं आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाची आखणी, सहानुभूती आणि सर्जनशीलतेवर भर, कायदेशीर लेखन आणि अभ्यासपूर्ण संशोधनावर सखोल लक्ष केंद्रीत करणं तसेच या संपूर्ण शिक्षणाला मजबूत डिजिटल आधार देण्यात आलेला आहे. कायदेविषयक शिक्षणासाठी संस्थेनं शिष्यवृत्तीची सुद्धा सोय केली आहे. बिटस् लॉ स्कूल बी.ए. एल.एल.बी. ( B.A. L.L.B. ) (ऑनर्स) आणि बी. बी.ए. एल.एल.बी.  (B.B.A. L. L.B.) (ऑनर्स) हे दोन अत्यंत लोकप्रिय पाच वर्षांचं एकात्मिक पदवी अभ्यासक्रम सुरु करत आहेत. पहिलं शैक्षणिक वर्ष येत्या एक ऑगस्ट 2023 पासून सुरु होईल आणि प्रवेश मार्च 2023 पासून सुरू होणार आहे.


यावेळी बोलताना बिटस् पिलानीचे कुलपती कुमार मंगलम बिर्ला म्हणाले की, "एक समान, वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक ज्ञान अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उदय होण्यासाठी आमचे विद्यापीठ आणि विशेष शिक्षण केंद्र हातभार लावेल. अतिशय प्रतिष्ठित संस्था म्हणून बिटस् पिलानी सर्जनशील, बहुविद्याशाखीय आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या नेत्यांची नवीन पिढी तयार करण्यात पुढाकार घेण्यात अग्रभागी आहे. धाडसी आणि नवा दृष्टीकोन तसेच ध्येयासह, बिटस् लॉ स्कूल स्थानिक आणि जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या समकालीन आणि उदयोन्मुख समस्यांचं निराकरण करण्यासाठी कायदेविषयक शिक्षणाची पुनर्कल्पना करण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) आणि तरुण भारतीयांच्या वाढत्या आशा-आकांक्षांपासून प्रेरणा घेऊन, बिटस् लॉ स्कूल नवनवीन कल्पनांचा आविष्कार सादर करणारा एक चषक असेल. आम्ही जागतिक स्तरावर मापदंड निर्माण केलेले अध्यापनशास्त्र, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि अनोख्या विद्याशाखा महत्त्वाकांक्षी कायदेविषयक व्यावसायिकांसाठी एक अतुलनीय अनुभव निर्माण करेल."


बिटस् लॉ स्कूल कायदा क्षेत्रातील व्यासंगी, उच्च शिक्षण, व्यवसाय आणि धोरणनिर्मितीतील दिग्गजांकडून बौद्धिक मार्गदर्शन घेईल. सल्लागार समितीच्या काही सन्माननीय सदस्यांमध्ये न्यायमूर्ती यू. यू. ललित (प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि भारताचे माजी सरन्यायाधीश), न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण (प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश), पल्लवी श्रॉफ (व्यवस्थापकीय भागीदार, शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कंपनी), आणि हैग्रेव खेतान (व्यवस्थापकीय भागीदार, खेतान अँड कंपनी). प्रोफेसर (डॉ.) आशिष भारद्वाज बिटस् लॉ स्कूलचे संस्थापक डीन म्हणून सामील झाले आहेत. 


संस्थापक डीन प्राध्यापक (डॉ.) आशिष भारद्वाज म्हणाले की, "कायदा शिकण्याची ओढ असलेले, शैक्षणिक संशोधनाच्या सीमा आणखी पुढे नेण्याची इच्छा असलेले आणि वेळेवर न्याय मिळवून देण्यासाठी नैतिक विश्वाचा चाप वापरण्याच्या आमच्या धोरणांवर विश्वास असलेल्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना बिटस् लॉ स्कूल सामावून घेईल. आमचा प्रगतीशील, आंतरविद्याशाखीय आणि तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील दृष्टीकोन विद्यार्थ्यांना कायदा जाणून घेण्यास, कायद्याचा सराव करण्यास, कायद्यासोबत जगण्यास आणि कायद्याद्वारे सक्षम करण्यात नक्कीच मदत करेल. ज्यांनी भारताची निर्मिती केली त्यांच्या मूलभूत मूल्यांवर आणि भारताचे नेतृत्व करणार्‍यांच्या मूळ विश्वासांवर स्वतःला ठामपणे आधार देऊन एक प्रेरणादायी मापदंड बनण्याची आमची इच्छा आहे."


जगातील 55 देशात कार्यरत असलेल्या बिटस् पिलानीच्या एक लाख 70 हजारांपेक्षा अधिक माजी विद्यार्थ्यांच्या नेटवर्कमध्ये या स्कूलच्या विद्यार्थ्यांना सामावून घेत त्यांना नानाविध लाभ मिळतील. उद्योग नेते, संस्थापक, उद्योजक आणि विचारवंतांचे सर्वात मजबूत आणि चमकदार असे हे नेटवर्क आहे. एक समर्पित कार्यालय विद्यार्थ्यांची तयारी करुन घेत त्यांना विधी क्षेत्राला सामोरे जाण्यास सुसज्य करेल आणि आघाडीच्या कायदे संस्था, व्यावसायिक कंपन्या, बँका, एनजीओ आणि संशोधन संस्थांमध्ये त्यांचा प्रवेश सुलभ करेल.


बिटस् लॉ स्कूलचा अत्याधुनिक, संपूर्ण निवासी परिसर आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्याद्वारे मुंबई महानगर प्रदेशात 63 एकरमध्ये विकसित केला जात आहे. कायमस्वरुपी आणि शून्य-कार्बन फूटप्रिंट कॅम्पस 2024 मध्ये कार्यान्वित होणार आहे. परंतु बिटस् लॉ स्कूलने आपले कामकाज सुरु केले आहे. पवईतील हिरानंदानी गार्डन्समधील अत्याधुनिक हंगामी कॅम्पसमधून ऑगस्ट 2023 पासून त्यांचे पहिले शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे.


प्रवेशात विविधता आणि सक्षमता टिकवून ठेवण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. लॉ स्कूलमध्ये  तंत्रज्ञान आणि मीडिया कायदा; मनोरंजन आणि क्रीडा कायदा; कॉर्पोरेट आणि आर्थिक कायदा; आणि पर्यायी विवाद निराकरण आणि मध्यस्थी आदी विषयांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI