Dada Bhuse : सध्या राज्यातील कांदा (onion) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी घसरण झाली आहे. याच मुद्यावरुन विरोधकांनी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही आक्रमक पवित्रा घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. अशातच आता नाशिकचे (Nashik) पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी कांदा प्रश्नाबाबत तातडीची बैठक बोलावली आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आज (10 मार्च) दुपारी 12 वाजता नाफेडच्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणार आहे. 


Onion Price : राज्य सरकार कांदा प्रश्नावर तोडगा काढण्याच्या तयारीत


राज्यात कांदा प्रश्नावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. कांदा दराच्या मुद्यावरुन सभागृहातही विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. तसेच विविध ठिकाणचे शेतकरीही (Farmers) आक्रमक झाले आहेत. अद्याप सरकारने कांद्याच्या मुद्यावर कोणताही तोडगा काढला नाही. मात्र, यावर राज्य सरकार मार्ग काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. कांद्याला प्रती क्विंटल 200 रुपये द्यायचे की 500 रुपयाचं अनुदान द्यायचं यावर चर्चा सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, दादा भुसे (Dada Bhuse) आजच्या या बैठकीत काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 


NCP Agitation : आज चांदवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन


बैठकीनंतर दादा भुसे हे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नाशिक जिल्ह्यातील भागाचा आढावा घेणार आहेत. दादा भुसे हे चांदोरी, पिंपळगाव बसवंत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज कांदा प्रश्नावर चांदवडमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री दादा भुसे आढावा बैठक आणि पाहणी दौरा करणार आहेत. 


Nafed : नाफेडकडून कांद्याची खरेदी सुरु


विधीमंडळाच्या अधिवेशनात (Budget Session) कांदा प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आल्याचे सांगितले होते. बाजार समितीमध्येही लवकरच कांदा खरेदी केंद्रे (Onion buying centers) सुरु करण्यात येतील असंही त्यांनी सांगितले. त्यानुसार नाफेडकडून बाजार समितीच्या बाहेर कांद्याची खरेदी सुरु झाली आहे. खरेदीत आणखी वाढ करण्याची मागणी होत आहे. सध्या बाजारात कांद्याचा पुरवठा देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Onion : सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार, अनुदान किती द्यायचं यावर चर्चा सुरु