खामगावः खामगाव शहरालगत नांदुरा मार्गावर असलेल्या तुलसी कृपा ऍग्रोटेक कंपनीमध्ये भीषण आग लागली. या आगीमध्ये कापसाच्या गाठी आणि बारदाना संपूर्ण जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.


टावरी यांच्या तुलसी कृपा ऍग्रोटेक कंपनीच्या गोडाउनमध्ये कापसापासून तयार करण्यात आलेल्या कापसाच्या गाठी आणि बारदाना ठेवण्यात आलेला होता. या गोडाऊनला आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास अचानकपणे भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती खामगाव नगरपालिका व परिसरातील नगरपालिकांच्या अग्निशमन दलाला देण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या वाहनांनी घटनस्थळी पोहचून आगीवर पाण्याचा मारा करीत आग काही तासांच्या परीश्रमानंतर आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण गठानी आणि बारदाना जळून खाक झाल्या होत्या. ज्या ठिकाणी या रुईच्या गठानी ठेवण्यात आल्या होत्या त्या गोडाउन मध्ये विद्युत पुरवठा नाही. त्यामुळे ही आग कशामुळे लागली याच कारण अद्याप कळू शकलं नाही. यापूर्वी खामगावातील एमआयडीसी परिसरातील बीएसएनएल कार्यालयाला आग लागली होती. मात्र या आगीचे स्वरुप किरकोळ असल्याने मोठी हानी झाली नव्हती.


साडेतीन तासांची कसरत


आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. बारदाना आणि कापूस असल्याने आगीने थोड्या वेळातच रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाला साडेतीन तास कसरत करावी लागली. मात्र आगीवर नियंत्रण मिळवले तेपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते.


इतर महत्वाच्या बातम्या


Nagpur Covid : नागपुरात कोरोना ब्लास्ट शक्य? जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीत इशारा


राष्ट्रपतीपदाची निवडणूक आज जाहीर होणार; आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद


राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब


Vidhan Parishad Election: चुरस वाढली! भाजपचा सहावा उमेदवार घोषित, विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात