भंडारा : भंडाऱ्यातील (Bhandara) सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत आज, मंगळवारी पहाटे 03.15 वाजता मोठा स्फोट (Bhandara Company Blast ) झाला. या स्फोटात तीन कामगार जखमी झाले असून जखमी श्रमिकांना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात तत्काळ हलविण्यात आले. घटनेच्यावेळी कंपनीत काम करणाऱ्या इतर आणखी आठ कामगारांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आलेत. सुदैवाने या स्फोटात कुठलीही प्राणहानी झाली नसली तरी अचानक झालेल्या या मोठा स्फोटामुळे चांगलीच तारांबळ उडाली असून या घटनेमागील मूळ कारण अद्याप कळू शकले नाहीये. स्टील कंपनीत पहाटे झालेला हा स्फोट एवढा भयानक होता की कंपनीतील जवळपास असलेला परिसर देखील हादरला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली.
स्फोटात तीन कामगार जखमी
भंडाऱ्यातील मोहाडी तालुक्यातील वरठी येथे असलेल्या सनफ्लॅग आयर्न अन्ड स्टील कंपनीत आज, मंगळवारी पहाटे अचानक मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. स्टील उत्पादक सनफ्लॅग कंपनीत पहाटेच्या सुमारास फरनेश मध्ये हा ब्लास्ट झाला. त्यातील ज्वलंत ज्वाळा तिथं काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर उडाल्याने आठ कामगार यात भाजलेत. ही घटना आज पहाटे 3.15 वाजताच्या सुमारास घडली. यामुळं कंपनी व्यवस्थापनाने सर्व कामगारांवर तातडीने प्राथमिक औषधोपचार केला. यात पाच कामगार किरकोळ जखमी झाल्यानं त्यांना सुट्टी देण्यात आली. तर, इतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नागपूर येथील शुअरटेक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. नागपूर इथं उपचार करणाऱ्यांमध्ये नामदेव झंझाड (57), इंजिनियर सागर जमाने (25) आणि कॉन्ट्रॅक्टर लेबर हटवार (30) यांचा समावेश आहे. या प्रकरणी तपास सुरू असून या अपघाता मागील नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.
परिसरातही बसले हादरे
स्टील कंपनीत झालेला स्फोट एवढा भयानक होता की, कंपनीतील जवळपास असलेला परिसर देखील जबर हादरे बसले होते. पहाटेच्या सुमारास झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. या दुर्घटनेत कंपनीतील सामानाचे देखील मोठे प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने या स्फोटात कुठलीही प्राणहानी झाली नाही. अचानक झालेल्या या मोठा स्फोटामुळे चांगलीच तारांबळ उडाली असून अद्याप तरी या स्फोटमागील कारण कळू शकले नाही.
हेही वाचा: