Bhandara News : संतापाच्या भरात एका महिनेने दोन चिमुकल्यांसह वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या कारधा पोलिस स्टेशन हद्दीतील तिड्डी गावात घडली आहे. दीपाली शितलकुमार खंगार (वय 27 वर्ष) असं मृत आईचं नाव असून देवांशी खंगार (वय 3 वर्ष) आणि वेदांशी खंगार (वय दीड वर्ष) अशी मृत मुलींची नावं आहे.
या महिलेने हे कृत्य का केलं याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तिड्डी गावातील रहिवासी दीपाली यांनी आपल्या दोन मुलींसह काल (14 ऑक्टोबर) रात्री 12 वाजता तिड्डी इथून जाणाऱ्या वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कारधा पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला. आज (15 ऑक्टोबर) सकाळी त्या तिघांचा मृतदेह सापडला आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनाकरता भंडारा सामान्य रुग्णालय दाखल करण्यात आला असून कारधा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नाशिकमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची अपत्यांसह आत्महत्या
दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी नाशिकमध्येही एका विवाहितेने पोटच्या दोन अपत्यांसह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. सिन्नर तालुक्यातील मोह इथे ही घटना घडली होती. या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून 12 वर्षीय मुलगी आणि 9 वर्षीय मुलासह पाझर तलावात उडी घेत जीवन संपवलं होतं. ज्योती विलास होलगीर असं मृत आईचं नाव असून गौरी विलास होलगीर आणि साई विलास होलगीर अशी मृत मुलांची नावं आहेत. याप्रकरणी विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन पतीसह सासरच्या चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
सोलापूरमध्ये पहिल्या पत्नीने ज्या विहिरीत आत्महत्या त्यातच दुसऱ्या पत्नीने उडी मारुन आयुष्य संपवलं
तर 30 सप्टेंबर रोजी सोलापुरातील बार्शी तालुक्यातील कुसळंब गावात एका महिलेने आपल्या चिमुरड्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. धक्कादायक बाब म्हणजे याच विहिरीत बाबासाहेब काशीद यांच्या पहिल्या पत्नीने देखील दोन मुलींनी घेऊन आत्महत्या केली होती. त्याचीच पुनरावृत्ती दुसऱ्या पत्नीने देखील केल्याने एकच खळबळ उडाली. बाबासाहेब काशीद यांची पहिली पत्नी अनुराधा हिने अवघ्या तीन वर्षाची मुलगी अक्षरा आणि पाच वर्षाची मुलगी आदिती या दोघींना स्वतःच्या कमरेला साडीने बांधून घेत 27 जुलै 2017 रोजी आत्महत्या केली होती
संबंधित बातमी
Nashik : धक्कादायक! सासरच्या त्रासाला कंटाळली, सिन्नरमध्ये विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल