भंडारा : भेल प्रकल्पाच्या नावानं (Bhandara BHEL Project) राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल पटेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दिग्गज नेत्यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या. भेल प्रकल्पाच्या मुद्द्यावरून वादावादी करीत एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडल्यात. मात्र प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या शेकडो एकर शेतजमिनीवर 11 वर्षानंतरही प्रकल्पाची निर्मिती झालेली नाही. एवढ्या वर्षानंतरही तिथं केवळ सुरक्षा भिंत आणि भेल प्रकल्पाचा फलक यापलीकडं काहीही दिसत नाही. 


भंडारासारख्या मागास जिल्ह्यात एका राष्ट्रीय प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित करून सर्व सोपस्कार पार पडलेले असताना हा प्रकल्प केवळ राजकीय अनास्थेमुळं 11 वर्षांपासून सुरुवात होण्यापूर्वीच बंद पडल्याचा लाजिरवाणा प्रकार आहे. यामुळं ज्या शेतकऱ्यांनी त्यांचं जीवनमान उंचावेल या अपेक्षेनं त्यांच्या शेती प्रकल्पासाठी विकल्यात, त्यांच्यावर मात्र आता भूमीहीन होऊन कुटुंबाच्या पालन पोषणासाठी त्यांना गावातून इतरत्र जावे लागत आहेत. अनेकांना दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्यांकडे मोलमजुरी करावी लागत आहे. 


विवाहोत्सुक तरुणांकडं आता शेती नसल्यानं त्यांना विवाहासाठी मुली मिळत नसल्याचं वास्तव समोर आलं आहे. आता भेल प्रकल्प तात्काळ सुरू करावा अन्यथा त्यांची शेती परत करावी या मागणीला घेवून ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. किमान प्रकल्प सुरू होत नाही, तोपर्यंत शेतीतून पिकं घेण्याचा संकल्प केला असून 5 जुलैपासून प्रकल्पाच्या गेटसमोर ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत.


1) प्रकल्प बाधित गावांची संख्या - 3 मुंडीपार, खैरी, बाम्हणी.
2) प्रकल्पासाठी जवळपास 600 एकर शेती अधिग्रहित करण्यात आली.
3) 217 शेतकरी प्रकल्प बाधित
4) प्रकल्पासाठी 2013 मध्ये शेती अधिग्रहित केली 
5) शेतीला प्रति एकर - 9.5 लाख प्रति एकर व 6.1 लाख प्रती कुटुंब नुकसान भरपाई देण्यात आली.


बाम्हणी गावाच्या चौकात वडाच्या झाडाखाली ग्रामस्थ एकत्र बसलेले असताना पाच व्यक्तींसोबत हा चौपाल केला आहे. यात तीन वृद्ध प्रकल्पग्रस्त, गावाचे सरपंच आणि या क्षेत्रात शिक्षणाचे जाळे पसरविणाऱ्या एका शिक्षण महर्षीचा समावेश आहे.


ही बातमी वाचा: