Bhandara News : प्रसूत वेदना आल्यानंतर गर्भवती मातेला ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीकरिता दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रसुतीनंतर नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. तर, मातेची प्रकृती चिंताजनक असल्यानं तिला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आलं. मात्र वाटेत असतानाचं मातेचाही रुग्णवाहिकेतचं दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदुरात घडली.
आरोग्य सुविधेचा अभाव असल्यानं ही घटना घडल्याचा नागरिकांकडून रोष
मिळालेल्या माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यातील आसोला या गावातील रीना शहारे यांना प्रसूतकळा आल्यानं कुटुंबीयांनी तिला सोमवारी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर काल (19 ऑगस्ट 2025) सकाळी महिलेची प्रसूती झाली आणि तिनं एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, काही वेळात नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेची प्रकृती अचानक बिघडल्यानं तिला भंडारा जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं. मात्र, वाटेत असताना तिचाही मृत्यू झाला. लाखांदूर हे भंडारा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील तालुका आहे. तिथं आरोग्य सुविधेचा अभाव असल्यानं ही घटना घडल्याचा रोष आता नागरिकांकडून करण्यात येत आहे. यापूर्वीही काही महिन्यापूर्वी लाखांदूर तालुक्यातील एका महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्यानं मोठ्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, याबाबत लाखांदूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ठाकरे यांच्याशी वारंवार संपर्क साधला मात्र, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही, त्यामुळं रुग्णालयाची बाजू समजू शकली नाही. मात्र या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
धक्कादायक! स्कुलबस चालकाने बस घातली पुरातून, लहान मुलांचा जिव धोक्यात
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातील नामांकित स्कुलच्या स्कुल बसमधून ग्रामीण भागातून चिमुकले विद्यार्थ्यांना ये-जा करते. मात्र मुसळधार पावसामुळे करजगाव बहिरम जवळ पूर आलेला असतांना देखील लहान मुलांच्या जीवाची पर्वा न करता बस चालकाने बस पुराच्या पाण्यात टाकली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून पालक वर्गात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे परतवाडा वाहतूक विभागाचे अधिकारी स्कुलबसवर कारवाई सोडून लहान ऑटोवर कारवाई करून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या या बस चालकावर नेमकी काय कारवाई होते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
संबंधित बातमी: