Horoscope Today 20 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 20 ऑगस्ट 2025, आजचा वार बुधवार आहे. आज श्रावणातील बुधवार असल्याने आजचा दिवस खास आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीविठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज कोणत्याही परिस्थितीत तुमचे काही अडणार नाही, नशीब तुमच्यासोबत असेल.   

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज कष्टाची तमा न बाळगता परिस्थितीचा योग्य आढावा घेऊन परिस्थितीच्या झोतात येण्याचा काळ आहे      

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज लेखकांना त्यांच्या कल्पनाशक्तीला आव्हान देणारे लिखाण करता येईल, भाग्य उजळवून टाकणाऱ्या घटना घडतील  

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांनी नेटाने अभ्यास करायला हवा, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीस उतराल  

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज व्यवसाय धंद्यात नवीन कामे मिळतील, आवश्यक त्या सुविधा मिळाल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज महिलांचा घरामध्ये खूप वेळ जाईल, घरामध्ये दुरुस्तीचे अनेक कामे निघतील 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज व्यवसाय नोकरीबाबत नवीन धोरणांचा अवलंब कराल आणि त्याची पूर्तता ही कराल   

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज मधुर बोलण्यामुळे इतरांची मने जिंकून घ्याल, घरामध्ये मनासारखी खरेदी कराल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज चैनीच्या वस्तू घरामध्ये मागवाल, जवळच्या व्यक्तींचा जास्त विचार कराल     

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज कधी कधी अति भावना, विवशता जाणवेल, घरामध्ये मंगलकार्य ठरल्यामुळे उत्साही, आनंदी वातावरण निर्माण होईल           

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज हाती आलेले काम चोख कराल, थकवा आला तरी तो व्यक्त करणार नाही      

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज  प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला हवे, करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल.

हेही वाचा :           

Pithori Amavasya 2025: यंदाची पिठोरी अमावस्या 'या' 5 राशींचं भाग्य घेऊन येतेय! तिथी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व, A टू Z माहिती वाचा..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)