Cranberry Juice For Weight Loss : खरे तर आपलं वाढलेलं वजन कमी करण इतकं सोपं नाही. यासाठी अनेक पथ्य पाळावी लागतात आणि नियमितपणे वर्कआऊट करावं लागतं. तसेच आपल्या खाण्यावरही नियंत्रण हवं. हल्ली अनेकांच्या जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे आणि बैठे कामामुळे लठ्ठपणा आणि वजन वाढत आहे. परंतु वजन कमी करणं (Weight Loss) वाटतं तितकं सोप नाही. हे वाढलेलं वजन कमी करण्याच्या रेसमध्ये आपल्या आजूबाजूला असंख्य लोक आहेत. वजन कमी करताना चांगल्या-चांगल्या लोकांना घाम फुटतो. या प्रवासात मनासारखा रिझल्ट मिळेलच, याची काही खात्री नसते. कुणाला सडपातळ शरीरयष्टी हवीय, तर कुणाला फक्त पोटाची चरबी कमी करायची आहे. अनेक लोक तर त्यांच्या समोर आवडीची डिश येऊनही ती खाणं टाळतात आणि जिममध्ये अनेक तास वर्कआऊट करून घाम गाळताना दिसून येतात. पण तुमचं वजन कमी करण्यासाठी सोपी ट्रिक कळली तर तुमचा हा प्रवास आणखीन सोपा होऊ होऊ शकतो. यासाठी तुमच्या नियमित आहारात क्रॅनबेरी ज्यूसचा (Cranberry Juice) समावेश करू शकता. यामुळे तुमचा वजन कमी करण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो. हे सविस्तरपणे जाणून घेऊया...


वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे क्रॅनबेरी ज्यूस


क्रॅनबेरी ज्यूसपासून भरपूर फायबर मिळतात. फायबरचं सेवन केल्यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटू शकतं आणि लवकर भूक लागत नाही. तुम्हाला अतिरिक्त जेवण, जंक फूड किंवा फूड क्रेविंगसारख्या वाईट सवयीपासून दूर राहावं लागेल. यामुळे तुमच्या शरीरातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी मदत मिळू शकते. क्रॅनबेरी ज्यूसमध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळे शरीरातील बायो अॅक्टिव्ह कंपाऊंसारखं कार्य करतं आणि  तुमच्या शरीरातून विषारी घटक बाहेर टाकले जातात. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.


क्रॅनबेरी ज्यूसपासून  मिळणारे पोषक तत्व


युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चर यांच्या म्हणण्यानुसार,  क्रॅनबेरीच्या फळांमध्ये 87 टक्के पाणी आढळून येतं. एक 100 ग्रॅम कॅनबेरीपासून 46 ग्रॅम कॅलरीज, प्रोटीन 0.2 ग्रॅम, फॅट 0.1 ग्रॅम आणि फायबर 4.6 ग्रॅम आणि विटामिन सी, विटामिन के-1  यासारखे पोषण तत्व मिळतात. या सर्व पोषण तत्वांमुळे क्रॅनबेरी ज्यूसपासून अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. तुमच्या नियमित आहारात क्रॅनबेरी ज्यूसचा समावेश केला तर वजन कमी करण्यासोबत इतर अनेक फायदे मिळू शकतात.


घरी तयार करा क्रॅनबेरी ज्यूस 


तुम्हाला क्रॅनबेरी ज्यूस कोणत्याही ज्यूस सेंटरवर मिळू शकतं. पण आरोग्याच्या दृष्टीनं बाहेरील ज्यूस पिणे चांगलं नसतं. कारण ज्यूस जास्त काळ टिकावं, त्यामध्ये रसायनाचा वापर केला जातो. त्यामुळे शक्य असेल तर तुमच्या घरीचं क्रॅनबेरी ज्यूस तयार करा. हे ज्यूस बनवण्यासाठी 200 ते 300 ग्रॅम क्रॅनबेरी फळं आणि एक ते दोन आवळे घ्या. तसेच चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा जीरा पावडरचा वापर करा. पण हे ज्यूस तयार करताना क्रॅनबेरी आणि आवळ्यातील बिया बाजूला काढा. यानंतर एका मिक्सरमध्ये पिसून घ्या आणि यामध्ये गरजेनुसार पाण्याचा वापर करा. ज्यूस तयार केल्यानंतर ते एक चाळणीतून गाळून घ्या. यामध्ये चवीनुसार मीठ आणि जीरा पावडर टाका. यानंतर एखाद्या ग्लासमध्ये क्रॅनबेरी ज्यूससोबत बर्फाचा गोळा टाकून थंड ज्यूस पिण्याचा आनंद घ्या. यामुळे अनेक फायदे मिळू शकतात.