एक्स्प्लोर

Walmik Karad Surrender: 'चांगल्या माणसाला न्याय मिळत नाही...', संतोष देशमुखांच्या बहिणीचा संतप्त सवाल, नेमकं काय म्हणाल्या?

Walmik Karad Surrender: यंत्रणांवरती आमचा विश्वास नाही अशी परिस्थिती आहे, इतकी मोठी यंत्रणा जर तपास करत असेल, तर मग आतापर्यंत का शोध लागत नाही, असा सवाल संतोष देशमुख यांची बहीण प्रियंका चौधरी यांनी उपस्थित केला आहे.

Walmik Karad Surrender: बीड जिल्ह्यातील मस्साजोगगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (walmik Karad) यानी अखेर सीआयडी पुणे कार्यालयात आत्मसमर्पण केलं. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आणि दोन कोटींच्या खंडणीप्रकरणी वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी होत होती. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड गेल्या 22 दिवसांपासून फरार होते. पोलीस आणि सीआयडी त्याच्या मागावर होती. आज त्याने आत्मसमर्पण केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या कुटूबांने संताप व्यक्त करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. 

वाल्मिक कराडने स्वतः जाऊन आत्मसमर्पण केले आहे. माहिती नाही त्यांच्या मागे कोणाचा हात आहे. त्याचीही माहिती नाही, या प्रकरणातील आणखी तीन आरोपी फरार आहेत म्हणतात, त्यांना कधी पकडणार असा सवाल करत आम्हाला न्याय कधी मिळणार असं संतोष देशमुख यांच्या बहिनीने म्हटलं आहे.

एका चांगल्या माणसाला न्याय मिळत नाही, ही आज परिस्थिती आहे. लवकरात लवकर या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घ्या आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. भावाच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळाल्याने आम्हाला आणि माझ्या भावाला न्याय मिळाल्याचं समाधान तरी मिळेल. लवकरात लवकर त्या तीन आरोपींना देखील अटक केली पाहिजे. न्याय मिळाल्याशिवाय आमचं समाधान होणार नाही. यंत्रणांवरती आमचा विश्वास नाही अशी परिस्थिती आहे, इतकी मोठी यंत्रणा जर तपास करत असेल, तर मग आतापर्यंत का शोध लागत नाही, असा सवाल संतोष देशमुख यांची बहीण प्रियंका चौधरी यांनी उपस्थित केला आहे.

वाल्मीक कराड शरण येण्यापूर्वी काय काय घडलं?

वाल्मीक कराड पुण्यात सरेंडर करणार अशा २ दिवसांपूर्वी चर्चा
सकाळी 7 वाजता: पुण्यातील सी आय डी ऑफिस बाहेर आज वाल्मीक कराड याचे कार्यकर्ते आले एकत्रित
सकाळी 9 वाजता: सी आय डी ऑफिस बाहेर माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त
सकाळी 10 वाजता: पुणे पोलीस दलातील उपायुक्त संदीप गिल आणि  गुन्हे शाखेचे उपयुक्त निखिल पिंगळे सी आय डी ऑफिस बाहेर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दाखल
सकाळी 11 वाजता: 12 ते 1 दरम्यान वाल्मीक कराड सी आय डी  कार्यालयात दाखल होणार अशी माहिती समोर
दुपारी 12 वाजता: पुणे सी आय डी कडे सरेंडर करणार असल्याचे स्वतः वाल्मीक कराड याने व्हिडिओ केला शेयर
दुपारी 12.15 वाजता: MH23 BG 2231 स्कॉर्पिओ या वाहनातून चेहरा लपवत वाल्मीक कराड सीआयडी ऑफिसमध्ये दाखल 
दुपारी 1 वाजता: सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्याकडून वाल्मीक कराडची चौकशी सुरु

 

 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Beed Crime Dhananjay Deshmukh: मोठी बातमी! अंगरक्षकाची पिस्टल काढून धमकी दिली; दिवंगत सरपंच बंधू धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
अंगरक्षकाची पिस्टल काढून धमकी दिली; दिवंगत सरपंच बंधू धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
Beed Accident News: मनोज जरांगेंचे उपोषण सुटल्यानंतर दुःखद घटना, अंतरवालीहून परतताना उभ्या ट्रकला कारची धडक; मराठा आंदोलकाचा मृत्यू, दोघे गंभीर
मनोज जरांगेंचे उपोषण सुटल्यानंतर दुःखद घटना, अंतरवालीहून परतताना उभ्या ट्रकला कारची धडक; मराठा आंदोलकाचा मृत्यू, दोघे गंभीर
Beed Crime Santosh Deshmukh Case: 'संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नकोस, प्रकरण मिटवून घ्यायला सांग'; साक्षीदार दादा खिंडकरला सख्ख्या भावाकडूनच धमकी, नेमकं प्रकरण काय?
'संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नकोस, प्रकरण मिटवून घ्यायला सांग'; साक्षीदार दादा खिंडकरला सख्ख्या भावाकडूनच धमकी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election 2026: साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Embed widget