Beed Lok Sabha : बीड लोकसभा मतदारसंघात (Beed Lok Sabha Constituency) भाजपकडून (BJP) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली असून, महाविकास आघाडीचा उमेदवार (Maha Vikas Aghadi Candidate) मात्र अजूनही ठरलेला नाही. अशात विनायक मेटेंच्या (Vinayak Mete) पत्नी पंकजा मुंडेंविरोधात लोकसभेत उतरणार असल्याच्या चर्चा पाहायला मिळत होत्या. मात्र, आज मेटे समर्थकांची बैठक झाली असून, विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंनी (Jyoti Mete) शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवावी असा एकमताने निर्णय झाला आहे. 


विधान परिषदेमध्ये विनायक मेटे यांना भाजपने डावलण्याचं काम केलं आणि याची सल कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आजही पाहायला मिळते. दुसरीकडे भाजपने पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेचे तिकीट जाहीर केल्यानंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीत ज्योती मेटे यांनी शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आले आहे. 


ज्योती मेटे नेमका काय निर्णय घेतील?


ज्योती मेटे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे ज्योती मेटे यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी यासाठी बीडमधील शिवसंग्राम भवन येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ज्योती मेटे यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली पाहिजे असं एकमताने ठरविण्यात आले. त्यामुळे आता ज्योती मेटे नेमका काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत भाजपासोबत असलेला शिवसंग्राम पक्ष आता शरद पवार गटात जाणार का? असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. 


शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक पाहायला मिळणार?


महाविकास आघाडीत बीडची जागा शरद पवारांना सुटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीवेळी धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटात सहभागी झाले. अशात धनंजय मुंडे यांची ताकद पंकजा मुंडे यांना मिळणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचे आव्हान पवारांसमोर आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवारी देऊन शरद पवार मास्टरस्ट्रोक प्लॅन करू शकतात. कारण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, विनायक मेटे यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठं योगदान आहे. मराठा आरक्षणाच्या बैठकीला जातानाच त्यांचा अपघात झाला होता. त्यामुळे ज्योती मेटेंना सहानुभूती मिळू शकते. आता शरद पवारांकडून ज्योती मेटेंना उमेदवारी जाहीर केलेई जाते का? आणि स्वतः ज्योती पवार देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार असतील का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी : महाविकास आघाडीत ठाकरे गटाला 22 जागा मिळणार?, कुणाला कुठून उमेदवारी?