Police FIR On Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या मागणीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बीड (Beed) जिल्ह्यात जरांगे यांच्यावर दोन दिवसांत एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांची नोटीस न स्वीकारणे, प्रक्षोभक भाषण करणे तसेच खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप करत जरांगे यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, 2024 मध्ये बीड जिल्ह्यात जरांगे यांच्यावर एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


मनोज जरांगे यांच्याकडून मागील काही दिवसांपासून राज्याचा दौरा केला जात आहे. याच दौऱ्याच्या निमित्ताने जरांगे मागील दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात होते. या काळात त्यांनी मराठा समाजाच्या बैठका घेत काही ठिकाणी सभा देखील घेतल्या. दरम्यान, यावरून पोलिसांकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यात, जिल्ह्यात घेतलेल्या बैठकांमध्ये जरांगे-पाटील यांनी नियमांचे उल्लंघन करणे, प्रक्षोभक भाषण करणे, खोटी माहिती प्रसारीत केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन दिवसांत अशी पाच गुन्हे दाखल झाले आहेत. याच अनुषंगाने जरांगे-पाटील यांना नोटीसही पाठवली होती, परंतु ती त्यांनी घेतली नसल्याचा देखील आरोप आहे. 


जरांगेंच्या सभांवर पोलीस नजर ठेवून 


मनोज जरांगे पाटील यांच्या बैठका आणि सभा रात्री उशिरा होत असतात. मात्र, आता या सभांवर पोलीस नजर ठेवून आहेत. ज्या ज्या ठिकाणी अशा बैठका झाल्यात अथवा सभा झाल्यात त्या ठिकाणी गुन्हे नोंद करण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. मागील दोन दिवसात बीड जिल्ह्यातील माजलगाव ग्रामीण, तसेच अंबाजोगाई शहर, नेकनूर अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तब्बल पाच गुन्हे मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध दाखल झाले आहेत.


अशोक चव्हाण जरांगेंच्या भेटीला...


बीड जिल्ह्याचा दौरा केल्यावर शनिवारी मनोज जरांगे आंतरवाली सराटीत दाखल झाले. दरम्यान, शनिवारी रात्री भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी आंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली. रात्री साडेअकरा वाजता सुरु झालेली बैठक मध्यरात्री दीड वाजता संपली. यावेळी दोघांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली. तर, पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचं म्हणत जरांगे यांनी सरकारविरोधात आपली नाराजी बोलवून दाखवली. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Maratha Reservation: सगेसोयऱ्यांच्या मराठा आरक्षणाची अंतिम अधिसूचना कधी निघणार? मुख्यमंत्री शिंदेंनी मनोज जरांगेंना डेडलाईन सांगितली