बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख (Ashwini Santosh Deshmukh) यांना केजमधील शिक्षण संस्थेत नोकरी देण्यात आली आहे. केज तालुक्यातील आडस गावातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कनिष्ठ लिपिक पदाची नोकरी त्यांना नोकरी देण्यात आली आहे. ही शिक्षण संस्था रमेश आडसकर यांची आहे. 


रमेश आडसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन अश्विनी देशमुख यांना नियुक्ती पत्र दिलं. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. आता त्यांना आडसमधील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाल नोकरी देण्यात आली आहे.


संतोष देशमुखांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली. या हत्येमागे वाल्मिक कराड टोळीचा हात असल्याचं समोर आलं. त्यामधील सहा आरोपी आता गजाआड असून एक आरोपी, कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे.


बीडमध्ये बी टीम कार्यरत


संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींची बी टीम बीडमध्ये कार्यरत असल्याचा आरोप संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी केला आहे. त्या बी टीमची अद्याप कोणतीही चौकशी झाली नसल्याचाही आरोप धनंजय देशमुखांनी केला. ही बी टीम कोण चालवतं हे सर्वांना माहित आहे असं म्हणत त्यांनी घनंजय मुंडे यांच्याकडे अप्रत्यक्ष निर्देश केल्याची चर्चा आहे. 


सुदर्शन घुलेचे व्हॉईस सँपल तपासणार


संतोष देशमुख  प्रकहत्यारणातील आरोपी सुदर्शन घुले याची पुन्हा सीआयडीने कस्टडी घेतली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला पूरक खंडणी प्रकरणाचा गुन्हा आहे आणि या खंडणी प्रकरणांमध्ये सुद्धा सुदर्शन घुले याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र या प्रकरणात अद्याप  सुदर्शन घुले याची चौकशी झाली नव्हती. म्हणून न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुदर्शन घुलेला पुन्हा पोलिस कस्टडीमध्ये घेण्यात आले आहे.


खंडणीच्या गुन्ह्यामध्ये यापूर्वीच वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे ची चौकशी झाली आहे. मात्र सुदर्शन घुलेची चौकशी होणे बाकी होते. या पोलिस कस्टडीमध्ये सुदर्शन घुलेचे व्हाईस सॅम्पल घेतले जाणार आहेत. सध्या सुदर्शन घुलेला केज शहर पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. 


 



ही बातमी वाचा :