बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातनंतर बीड सातत्यानं चर्चेत आहे. धनंजय देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना गौप्यस्फोट केला आहे. वाल्मिक कराडच्या कथित बी टीममधील चार जणांची नावं देशमुख यांनी जाहीर केली आहेत. बालाजी  तांदळे, संजय केदार,डॉय वायबसे आणि मोराळे अशी चार जणांची नावं धनंजय देशमुख यांनी जाहीर करत त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल विचारला आहे. 


धनंजय देशमुख यांनी बी टीममधील चार नावं स्पष्ट आहेत.  जे की आरोपीला सोडायला गेले होते. भावाच्या पाठीमागं जी गाडी होती ती घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे, 6 तारखेला, 9 तारखेला शेजारच्या गावचे संरपंच संजय केदार  त्यांना आरोपींचा फोन आला होता. फोन पे ज्यांना पैसे झाले होते ते डॉ. वायबसे ही बी टीम असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे. 


बीड शहरातील बीड पोलीस स्टेशनमध्ये सीआयडी काम करत असताना धनंजय देशमुख यांनी लेखी अर्ज केला होता. सांगितलं होतं, की त्यांनी यातील आरोपींना मदत केलेली आहे. ती कधी पैशाच्या स्वरुपात होती, कधी गाडीच्या स्वरुपात होती, कधी साहित्य पुरवण्याच्या स्वरुपात होती. मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला. तर, पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांनी म्हटलं की आम्ही पुरावे तपासले तर त्या लोकांचा सहभाग नाही. एकीकडे धनंजय देशमुख म्हणत आहेत आम्ही पुरावे देतोय तर पोलीस यांच्या विरोधात पुरावा सापडत नाही, असं म्हणतात. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना मदत करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. 


धनंजय देशमुख यांनी जे निर्दोष आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या असं कुठंही बोललेलो नाही. आम्ही म्हणतोय दोषींवर कारवाई करा, आरोपींना फाशीची शिक्षा द्या, जे आरोपी आहेत ते जेरबंद आहेत. जे लोक रेकी करत आहेत, सुनावणीला आरोपी येतात त्यावेळी ते लोक कसे येतात, असं धनंजय देशमुख म्हणाले. सीडीआर आहेत,ते मदत करताना पाहायला मिळत आहेत त्यांना गुन्हेगार जाहीर करा, अशी मागणी धनंजय देशमुख म्हणाले. 


बालाजी तांदळे कुणासाठी काम करतो, तो कुणासाठी काम करतो, हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. ज्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना सहकार्य केलं, ते लोक कुणाचे आहेत याचं उत्तर द्या, असं धनंजय देशमुख म्हणाले. 



इतर बातम्या : 


Beed Crime: बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम ॲक्टिव्ह, पोलिसांचं दुर्लक्ष; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप