Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणाने राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात (Kej Police Station) सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका (Walmik Karad MCOCA) दाखल करावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. अखेर तीन दिवसांपूर्वी वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आला आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. या प्रकरणातील कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. आता आरोपींवर मकोका लागल्यानंतर सीआयडीचे तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत.   


संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीचे किरण पाटील (Kiran Patil) करणार आहेत. अनिल गुजर (Anil Gujar) यांच्याकडील तपास आता किरण पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. मकोका कायद्याअंतर्गत कारवाई झाल्यास त्या प्रकरणाचा तपास डीवायएसपी रँकच्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात येतो. आतापर्यंत या प्रकरणाचा तपास करणारे अनिल गुजर हे पोलीस निरिक्षक रँकचे अधिकारी आहेत‌. त्यामुळे त्यांच्याकडील तपास डीवायएसपी अर्थात उपअधिक्षक रँक असलेल्या किरण पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 


एसआयटीपाठोपाठ सीआयडीत बदल


दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जुने एसआयटी पथक काही दिवसांपूर्वीच बरखास्त करण्यात आले. एसआयटी पथकामधील अनेकांवर आरोप करण्यात आले होते. जुन्या एसआयटी पथकातील अधिकाऱ्यांचे फोटो वाल्मिक कराड याच्यासोबत दिसले होते. त्यानंतर एसआयटीवर आक्षेप घेण्यात आला होता. यामुळे जूनी एसआयटी बरखास्त करून नव्या एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. जुन्या एसआयटी पथकामध्ये 9 अधिकारी-कर्मचारी होते, मात्र आता 9 ऐवजी 6 जणांचा समावेश करण्यात आला असून उपमहानिरीक्षक बसवराज तेली हे एसआयटीचे प्रमुख आहेत. यानंतर आता प्रकरणातील सीआयडी पथकातही बदल करण्यात आला आहे. 


विष्णू चाटेची लातूर कारागृहात रवानगी


संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि दोन कोटींची खंडणी या दोन्ही गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता विष्णू चाटेची बीड ऐवजी लातूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याला लातूरच्या साई परिसरातील जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आल्याची माहिती कारागृह प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Beed Crime News: बीड जिल्ह्यात आणखी 60 शस्त्र परवाने रद्द; जिल्हाधिकाऱ्यांकडून आत्तापर्यंत 160 शस्त्र परवाना रद्द