Beed Crime News बीड: बीड जिल्ह्यात आणखी 60 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी पाठक यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी 100 आणि आता 60 शस्त्र परवाने रद्द झालेत. त्यामुळे हा आकडा 160 वर पोहोचला. पोलीस प्रशासनाच्या पत्रानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केलीय. 


सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड मधील शस्त्र परवान्याचा मुद्दा समोर आला होता. लोकप्रतिनिधी सह सामाजिक कार्यकर्त्यांनी या विरोधात आवाज उठविला. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने शस्त्र परवाना असल्याची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने संबंधितांना नोटीस बजावून सुनावणी घेतली. दरम्यान जवळपास 160 शस्त्र परवाने रद्द झाले आहेत. बीड जिल्ह्यात 1281 शस्त्र परवाने आहेत. त्यातील 232 जणांवर गुन्हे दाखल होते. या आधारावर 160 परवाने रद्द झाले असून आणखी 72 लोक रडारवर आहेत.


संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी लातूर कारागृहात-


2 कोटींची खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण या दोन्ही गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे न्यायालयीन कोठडी याला सुनावल्यानंतर विष्णूचाटे त्याची आता बीड ऐवजी लातूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.  त्याला लातूरच्या साई परिसरातील जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आल्याची माहिती कारागृह प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. मला लातूरच्या कारागृहात ठेवण्यात यावे, अशी मागणी चाटे याने न्यायालयाकडे केली होती. आवादा कंपनीला मागितलेली 2 कोटींची खंडणी आणि संतोष देशमुख यांची हत्या या दोन्ही गुन्ह्यांमध्ये विष्णू चाटे हा आरोपी आहे.


बार्शीत 6 बांगलादेशी नागरिकांसह एकूण 9 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात-


सोलापुरातल्या बार्शीत अनधिकृत पद्धतीने राहणाऱ्या 6 बांगलादेशी नागरिकांसह एकूण 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बार्शी शहरात अवैधपणे राहणाऱ्या 5 महिला आणि 1 बांगलादेशी पुरुषाला अटक केली आहे. तर यांना बार्शीत राहणासाठी मदत करणाऱ्या तिघांना देखील पोलिसांनी अटक केली. दहशतवाद विरोधी पथक सोलापूर युनिट आणि बार्शी पोलिसांची संयुक्त कारवाई केली. बार्शी शहरातील तेलगिरणी परिसरात विनापरवाना 6 बांगलादेशी राहत असल्याची पोलिसांना मिळाली माहिती होती. पोलीस पथकाने बांगलादेशी नागरिकांकडे पासपोर्ट, व्हिज यांच्यासह भारतात राहण्यासाठी लागणाऱ्या परवानगीकीचे कागदपत्र मागितले असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आढळून आली नाही. धक्कादायक बाब म्हणजे यातील 2 बांगलादेशी नागरिकांकडे बनावट आधार कार्ड  देखील आढळून आले आहेत. या 9 आरोपी विरोधात भारतीय पारपत्र अधिनियम 1950 चे कलम 3(A), 6 (A) सह परकीय नागरीक आदेश 1948 कलम 3(1), विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 कलम 14 सह भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 336 (3), 338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


संबंधित बातमी:


मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका?