बीड : इंडिया आघाडीचं (India Allience) सरकार आल्यावर मोदी सरकारच्या (Modi Government) योजना कॅन्सल करतील, काँग्रेस (Congress) आणि इंडिया आघाडीचं (India Aghadi) सरकार राम मंदिरही (Ram Mandir) कॅन्सल करेल, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बीडच्या अंबाजोगाई येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभेत पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.


काँग्रेस आणि इंडिया आघाडी राम मंदिरही कॅन्सल करेल


इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर हे लोक मोदींची किसान सन्मान निधी योजना कॅन्सल करतील. गरीबांना मोफत रेशन देण्याची योजना कॅन्सल करतील, 55 कोटी गरीबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची योजना देखील काँग्रेस कॅन्सल करेल. इतकंच नाही, तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीवाले राम मंदिरही कॅन्सल करेल. 


मोदींवा गोपीनाथ मुंडेंची आठवण


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, गोपीनाथ मुंडेंसोबत मनाचे संबंध होते, ते नेहमी मराठवाड्याच्या विकासाची चर्चा करायचे. 2014 मध्ये मला तुम्ही साथ दिली, त्यावेळी गोपीनाथजी सारख्यांना निवडून दिल्लीला घेवून गेलो. पण दुर्दैवाने काही दिवसात मला माझ्या सहकारी ला गमवावे लागलं. सुषमा स्वराज, अरुण जेटली यांना गमावल्यानंतर माझे हात कट झाल्याची भावना निर्माण झाली. स्वाभाविक आहे मला आज गोपीनाथ जीची आठवण येत आहे, असं मोदींनी म्हटलं.


काँग्रेसचा राम मंदिराला विरोध


मी आज तुमच्याकडे काही मागायला आलोय. मला तुमचे आशीर्वाद पाहिजे आहेत. माझी संपत्ती तुम्ही आहात. तुम्हीच माझे कुटुंब आहात. माझा देश माझे कुटुंब. एका काँग्रेस नेत्याने ज्याने काही दिवसा पूर्वी काँग्रेस सोडली. त्यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. ज्यावेळी राम मंदिराचा निकाल आला, त्यावेळी शहजाद्याने म्हटलं होतं की, काँग्रेस सरकार आल्यावर राम मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल  बदलणार होते, असं वक्तव्य मोदींनी केलं आहे.


पाहा व्हिडीओ : नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?