Dasara Melava: पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या सावरगाव येथील दसरा मेळाव्यात कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला आहे. पंकजा मुंडे यांचे भाषण संपल्यानंतर काही उत्साही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना आवरण्याचं प्रयत्न झाला, मात्र कार्यकर्ते काही ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे अखेर पोलिसांनी या उत्साही कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचं समोर येत आहे. विशेष म्हणजे भाषणाच्या सुरवातीलाचा काही तरुणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. 


दरवर्षीप्रमाणे यावेळी सुद्धा पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सावरगाव घाट येथे दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान पंकजा मुंडे भाषण करण्यासाठी उभे राहिले असतानाच समोर आलेल्या काही तरुणांनी गोंधळ घालायला सुरवात केली होती. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी त्यांना दम देत शांत राहण्याचे आवाहन केले होते. मात्र पंकजा मुंडे यांचे भाषण संपताच काही उत्साही कार्यकर्त्यांनी पुन्हा गोंधळ घालायला सुरवात केली. यावेळी पोलिसांकडून त्यांना आवरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कार्यकर्ते काही आयकण्याच्या तयारीत नव्हते, त्यामुळे अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करून गर्दी पांगवली. 


आता 2024 च्या तयारीला लागा...


गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चेवर पंकजा मुंडे यांनी भाष्य करत आता या चर्चा बंद करा असे म्हटले आहे. तर मी आता 2024 च्या तयारीला लागली आहे. मी नाराज कुणावर होऊ, मी नाराज नाही. हे काही घरगुती भांडण आहे का? राजकारण आहे. संघर्ष माझ्या वाट्याला आहे. मी मंत्री आहे का, साधी ग्रामपंचायत सदस्य नाही तरीही तुम्ही का आला आहेत. त्यामुळे मी नाराज असल्याच्या बातम्या आता माध्यमांनी बंद करावे अशी हात जोडून विनंती आहे. त्यामुळे माझ्यासाठी आता हा विषय संपला असून, 2024 च्या तयारीला लागा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. 


इतरांचे जोडे उचलणाऱ्यांचं इतिहासात नाव होत नाही


यावेळी पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्यात की, प्रीतम ताई म्हणाल्यात की संघर्ष करो ही घोषणा बंद करा. मात्र कुणाला संघर्ष नाही आला आयुष्यामध्ये, संघर्षशिवाय नाव होत नाही. कुणाचे जोडे उचलणाऱ्यांचं इतिहासात कधीच नाव झालेलं नाही. मी गोपीनाथ मुंडेंच्या पोटी मी जन्म घेतला असून, मी संघर्ष नाकारू शकत नाही. छत्रपती शिवरायांना सुद्धा शेवटपर्यंत संघर्ष सुटला नाही. भगवान बाबा यांना सुद्धा संघर्ष करावा लागला.भगवान गड स्थापन करावा लागला पण त्यांनी संघर्ष सोडला नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्यात.  


महत्वाच्या बातम्या...


Pankaja Munde : रुकणार नाही, कोणासमोर झुकणार नाही, आता 2024 च्या तयारीला लागा, पंकजा मुंडेंचा एल्गार


Pankaja Munde : PM मोदीविरोधातील कथित वक्तव्यावर पंकजा मुंडे स्पष्टच म्हटल्या, ज्यांचा वारसा....