Pankaja Munde On Dasara Melava: राज्यात आज चार दसरा मेळावे होणार असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्यात उद्धव ठाकरे यांचा शिवाजीपार्क, एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदान, भगवान गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांच्या उपस्थितीत गडाच्या पायथ्याशी आणि चौथा पंकजा मुंडे यांचा सावरगावात दसरा मेळावा होणार आहे. दरम्यान पंकजा मुंडे आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर मेळाव्याच्या काही तास आधी यावर बोलतांना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दसरा मेळाव्यात कोणते मुद्दे असणार आहे? या प्रश्नाला उत्तर देतांना पंकजा मुंडे म्हणाल्यात की, सावरगाव येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी बहुसंख्य लोकं उपस्थित राहणार आहे. दसरा मेळाव्यात बोलण्यासाठी काय मुद्दे असणार आहे याबाबत अजून मी काहीही ठरवलं नाही पण पुढील दोन तासात तुम्हाला कळेल असे पंकजा मुंडे म्हणाल्यात. पण या वर्षभरात अनेक घडलेल्या घटना असतात, ज्या घटनांचा माझ्यासाठी उभे राहणारे, प्रेम करणारे भाऊ सैनिकांसारखे उभं राहतात आणि त्या घटनांबाबत थेट माझ्या तोंडून दोन गोष्टी बोलल्या गेल्यास त्यांना आधार वाटतो. त्यामुळे या वर्षभरात ज्या गोष्टी होतात त्यावर आम्ही दसरा मेळाव्यात बोलतो असेही पंकजा मुंडे म्हणाल्यात.
पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्यात की, सावरगावात होणार दसरा मेळावा राज्यभरातील लोकांसाठी असतो. ज्यात इथे देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, बुलढाणा,वाशीम,जळगाव आणि आगदी बारामतीपासून लोकं येत असतात. त्यामुळे हा मेळावा फक्त जिल्ह्यापुरता मर्यादित नसतो. राज्यातील प्रमुख वंचित लोकांसाठी हा मेळावा असतो. हा मेळावा म्हणजे वंचितांच्या विषयाला हात घालणारा आहे. या मेळाव्यात लोकांचा प्रचंड उत्साहा असतो आणि त्यांना काय लागते हे मला द्यावे लागते असं पंकजा मुंडे म्हणाल्यात.
शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्याला शुभेच्छा
मुंबईत आज दोन मेळावे होणार आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही मेळावे प्रचंड ताकदीने होतायत. सर्वांचं लक्ष या मेळाव्याकडे लागलं आहे. त्यामुळे दोघांनाही मी शुभेच्छा देत आहे. पण याचवेळी त्यांच्यापेक्षा वेगळा आणि खुर्च्याची सोय नसलेला माझा वेगळा मेळावा आहे. जनता हुशार असून ते सर्व पाहत आहे. कुणाचा मेळावा आणि कुणाची शिवसेना या सर्वांकडे मी नेहमीच कुतूहलाने पाहत असते. कारण मी या गोष्टीतून गेले आहे. एक मेळावाचं सीमोल्लंघन करून दुसरा स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे शिंदे गत आणि शिवसेना यांच्याकडे मी कुतूहलाने पाहते आणि आज सीमोल्लंघनाचा खरा त्यांच्यासाठी दिवस असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्यात.
महत्वाच्या बातम्या...