Beed News : महिलांनी सर्व प्रकारचे बसेस मध्ये 50 टक्क्याची सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दरम्यान एसटी बस सेवेला ऊर्जा देण्यासाठी अनौपचारिक सहलीच्या माध्यमातून बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी प्रयत्न केला आहे. यासाठी आज त्यांनी बीड बस स्थानक येथून चार वाजता एसटी बसद्वारे प्रवास करून नायगावचा प्रवास केला. यावेळी त्यांचा समवेत आई व त्यांच्या दोन्ही मुली तसेच विविध शासकीय महिला अधिकारी, एसटी महामंडळातील महिला अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या पत्नी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या पत्नी, बीड तहसीलदार यांच्या पत्नी होत्या.
महिलांनी उपयोग व लाभ घ्यावा
सर्व प्रकारचे बसेस मध्ये 50 टक्क्यांच्या सवलतीच्या दराचा लाभ घ्यावा असे आवाहन 'महाराष्ट्र शासनाने केले आहे. ज्यांचे वय 75 पेक्षा जास्त आहे अशा सर्व नागरिकांना एसटी बसेसमध्ये मोफत प्रवास सवलत शासनाने दिलेली आहे. तसेच महिलांना सर्व प्रकारचे एस टी बसेस (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस सेवा) मध्ये 50% च्या सवलतीच्या दरामध्ये सूट दिलेली आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्टी आहे मुलांच्या सुट्टी आहे. तर कुठेतरी बाहेर जायचे असते, मुलांना पण इच्छा असते, की बाहेर जावं शासनाचे ही सवलत दिली आहे. त्याचा सर्व महिलांनी उपयोग व लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले .
खूप वर्षानंतर बसमधून प्रवास
ग्रामीण महिलांच्या सोयीच्या दृष्टीने एसटी बसेसची व्यवस्था सुधारण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून चांगली सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. असे सांगून त्या म्हणाल्या, आज खूप वर्षानंतर मी बसमधून प्रवास करते आहे. आता प्रशासकीय सेवेत असल्याने व कामाचा व्याप असल्याने बसचा प्रवास कमी झाला आहे असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.
गुलाबाचे फुल देऊन केलं स्वागत...
महिलांनी सर्व प्रकारचे बसेस मध्ये 50 टक्क्यांची सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे याचा मोठं फायदा महिलांना होत आहे. सोबतच ग्रामीण भागातील महिलांना याचा अधिक फायदा होत आहे. दरम्यान एसटी बस सेवेला ऊर्जा देण्यासाठी बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आज एसटी बसमधून अनौपचारिक सहलीच आयोजन केलं होते. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील महिला देखील उपस्थित होत्या. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील महिलांची देखील उपस्थिती होती. यावेळी एसटी महामंडळाकडून गुलाबाचे फुल देऊन जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित महिला प्रवासी यांचे स्वागत करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या: