Beed Crime News: एका संतापजनक घटनेने बीड जिल्हा (Beed District) हादरला आहे. एका विवाहित महिलेवर तिच्याच दोन दिरांनी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आली आहे. आधी पिडीत महिलेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दोन्ही दिरांनी सतत आपल्याच वहिनीवर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. 


पिडीतेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पाच ते सहा महिन्यांपूर्वी पीडितेचा पती बाहेर गेला होता. दरम्यान एके दिवशी मोठा दीर जेवणासाठी घरी आला होता. मात्र जेवण दिल्यानंतर दिराने पीडीत महिलेला आवाज देत बोलावून घेत मोबाईलमध्ये मध्ये एक अश्लील व्हिडिओ दाखवला. व्हिडीओमध्ये महिला अंघोळ करताना दिसत होती. हा दाखवल्यानंतर आरोपी दिराने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आपल्या वाहिनीकडे शारीरिक सुखाची मागणी केली. त्यामुळे घाबरून गेलेल्या विवाहितेने सगळा प्रकार आपल्या सासऱ्यांना सांगितला. मात्र सासऱ्याने विश्वास न ठेवता,  उलट माझ्या मुलावर मला  विश्वास असल्याचे सांगत दुर्लक्ष केले. 


दरम्यान याच काळात पीडीत महिला घरी एकटे असल्याचे आरोपीने गैरफायदा घेत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. आपला व्हिडिओ व्हायरल होईल या भीतीने पीडीत महिलेना विरोध केला नाही. मात्र याचाच गैरफायदा घेत दिराने आपल्या वहिनीवर सतत अत्याचार केला. 


मावस दिराने देखील केला अत्याचार... 


वहिनीवर अत्याचार करणारा आरोपी दीर काही दिवसांनी मावस दिराला घरी घेऊन आला. तसेच घरी आणून त्याने गाडी घेण्यासाठी मदत केल्याने त्याच्यासोबत संबंध ठेव असे पीडित महिलेला सांगितले. मात्र महिलेने यासाठी नकार दिला. मात्र नकार देताच पुन्हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मावस दिराने देखील तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने महिलेला प्रचंड धक्का बसला होता. 


महिलेने आई-वडिलांच्या मदतीने केला गुन्हा दाखल... 


आधी दिराने आणि त्यानंतर मावस दिराने अत्याचार केल्याने महिला प्रचंड घाबरून गेली होती. विशेष म्हणजे सासऱ्याला याबाबत सांगून देखील कोणताही फरक पडला नव्हता. त्यातच दोन्ही दिरांकडून सतत शारीरिक संबध ठेवण्याची मागणी होत असल्याने महिलेनी माहेरी जात घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यांच्या मदतीने पिडीतेने गेवराई पोलीस ठाण्यात दोन्ही दिराच्या विरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed Crime News: दरोड्याची तयारी केली विशीत, अटक झाला बत्तीशीत; तब्बल तेरा वर्षांनी आरोपी पोलिसांना लागला हाती