Beed News: पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडियामध्ये ट्रोल झालेल्या पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पंकजा मुंडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात त्या 'मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) देखील हरवू शकत नाहीत' असं त्यांच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ आहे. यावरच बोलतांना त्यांनी 'आत्ताचे युद्ध सोशल मीडियावरून सुरु असून, एकमेकांना ट्रोल करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं' म्हणत पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बीडमधील एका नवरात्राच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 


काय म्हणाल्यात पंकजा मुंडे...


यावेळी बोलतांना त्या म्हणाल्यात की, मला खूप आनंद झाला की, मी जर कुणाला काम देऊ शकते,म्हणजेच मला काम मिळेल. सद्य मी बेरोजगारचं आहे. मला आवडली तुमची प्रार्थना. म्हणतात ना 'एक तीर मी दो शिकार' असे पंकजा मुंडे म्हणाल्यात. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा मनातील खदखद व्यक्त केली असल्याची चर्चा आहे. 


ट्रोलिंगवरून व्यक्त केली नाराजी...


याचवेळी बोलतांना पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपासून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या ट्रोलिंगबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्यात की, सेनापती युद्ध करतात, मात्र जुन्या काळातील युद्ध वेगळे आणि नव्या काळातील युद्ध वेगळे आहेत. साहेबांच्या काळातील नेते,कार्यकर्ते आणि परिस्थिती वेगळी होती. मात्र आत्ताचे युद्ध वेगळे असून, सोशल मिडीयावरून युद्ध लढवले जात आहे. तलवारी, भाले आणि ढाली याची काहीच गरज नाही. तू माझ्याबद्दल अफवा पसरव, मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर असे सोशल मिडियाचे युद्ध आहे. ज्यात आपण बसत नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. 


महत्वाच्या बातम्या...


मी जनतेच्या मनात असेल तर मोदीही मला संपवू शकणार नाहीत; पंकजा मुंडेंचं वक्तव्य


ठरलं! पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा सावरगावात होणार, कृती समितीची माहिती