गेवराई (जि. बीड) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Loksabha Election) राज्यात पैशाचा पाऊस सुरुच असून आता बीडमधील गेवराई तालुक्यातील चेकपोस्टवर इनोव्हामध्ये तब्बल एक कोटी कॅश सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. बॉर्डर चेक पोस्टवर एक कोटी रुपये तपासणी दरम्यान आढळले आहेत. गेवराई तालुक्यातील खामगावमध्ये असलेल्या जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्टवर काल (4 मे) रात्री एका इनोव्हा कारमध्ये एक कोटी रुपये सापडले. 


रक्कम कोषागार कार्यालयाकडे सुपूर्त केली जाणार


दरम्यान, यापैकी दहा लाख रुपयापेक्षा अधिकची रक्कम असल्याने ही रक्कम कोषागार कार्यालयाकडे सुपूर्त केली जाणार आहे. आयकर विभागाचे अधिकारी छत्रपती संभाजीनगर येथील बँकेच्या शाखेतून ही रक्कम काढली गेली होती की नाही याची माहिती घेणार आहेत. संभाजीनगरमधील द्वारकादास मंत्री बँकेच्या शाखेतून ही रक्कम बीड येथील बँकेच्या मुख्य शाखेत आणली जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यावेळी या पैशासोबत संभाजीनगर येथून पैसे बाळगण्याचे परवानगी पत्र होते असे पोलिसांचे म्हणणे आहे. 


दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री बीकेसी परिसरात बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकत  बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. या कारखान्यात  5,10,100,500 रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. पोलिसांनी याठिकाणी धाड टाकून बनावट नोटा आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदाचा साठा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी नौशाद शाह आणि अली सय्यद या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी बीकेसी पोलीस अधिक तपास करत आहेत. 


दादर आणि सायनमधून रोकड जप्त


काही दिवसांपूर्वीच मुंबई उपनगरमधील भांडूप परिसरात पोलिसांनी साडेतीन कोटींची रोकड असलेली एक गाडी पकडली होती. मात्र,निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर ही एटीएम व्हॅन असल्याचे समोर आले होते. या गाडीच्या चालकाकडे पुरेशी कागदपत्रे नसल्यामुळे पोलिसांना संशय आला होता. त्यामुळे ही एटीएम व्हॅन पोलिसांनी ताब्यात घेतली होती. मात्र, चौकशीनंतर ही व्हॅन सोडून देण्यात आली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या