बीड :  बीडच्या (Beed Illegal Abortion)  बक्करवाडी येथील महिलेच्या अवैध गर्भपात प्रकरणात बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अतिरक्तस्त्रावामुळे सीता गाडे या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाकडून छापेमारी सुरू करण्यात आली असून पोलिसांनी गेवराईच्या महिला एजंटला ताब्यात घेतले आहे.  या गर्भपात प्रकरणी ज्या नर्सवर गुन्हा दाखल करण्याच आला त्या नर्सचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. 


बीड तालुक्यातील बक्करवाडी येथील शितल गणेश गाडे या महिलेचा अवैध गर्भपात केल्याने मृत्यू झाला. बीडमध्ये पुन्हा एकदा अवैध गर्भपात करणारे रॅकेट सक्रिय झाल्याच्या संशयावरून पोलिस, आरोग्य विभाग ॲक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी या प्रकरणाची सखोल तपास करायला सुरुवात केली. पोलीस तपासामध्ये या प्रकरणी मुलीच्या गेवराई मधील एका महिला एजंटला अटक करण्यात आली होती. याच एजंटकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सकाळी बीड शहरातील नर्स असलेल्या सीमा सुरेश डोंगरे आणि मृत महिलेच्या पाच नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला. 


आपल्यावर गुन्हा दाखल झाला हे कळल्यानंतर नर्स असलेल्या सीमा डोंगरे कालपासून फरार होत्या. पोलिस त्यांचा शोध घेत असतानाच बीड ग्रामीण पोलिसांना पालीच्या बिंदुसरा धरणामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची चौकशी केली असता हा मृतदेह गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या सीमा डोंगरे यांचा असल्याचं निष्पन्न झालं


गर्भपात झाल्यानंतर मृत्यू झालेल्या महिलेचा गर्भपात सीमा डोंगरे यांनी महिलेच्या घरी जाऊन केल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली. या प्रकरणात मोठं रॅकेट उघड होईल या भीतीने सीमा यांचा घातपात झाला की त्यांनी आत्महत्या केली याचा तपास पोलिस करत आहेत.


संबंधित बातम्या :