एक्स्प्लोर

Beed Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेटमधील बीड जिल्हा नेमका कसा होता, नाव काय होतं, मोहम्मद बिन तुघलकाशी काय कनेक्शन?

Beed district: बीड जिल्ह्यात 60-70 वर्षांपूर्वी मोठे जंगल होते. या भागात वाघ, काळवीट, अस्वल, बिबट्या, रानडुक्कर, तरस आणि लांडग्यांचा नित्य वावर असायचा. 1635 मध्ये बीड मुघलांनी ताब्यात घेतले.

Beed Hyderabad Gazette: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनावेळी हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. तेव्हापासून हैदराबाद गॅझेटची (Hyderabad Gazette) प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. 1909 सालच्या हैदराबाद गॅझेटमध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचं म्हणजे त्यावेळच्या औरंगाबाद विभागातील बारीकसारीक तपशीलाची नोंद आहे. 1948 पर्यंत मराठवाडा निजामाच्या हैदराबाद संस्थानाचा भाग होता. म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा जवळपास वर्षभर मराठवाडा निजामाच्या तावडीत होता. अखेर अनेकांच्या संघर्षांतून १७ सप्टेंबर १९४८ ला मराठवाडा मुक्त झाला, स्वतंत्र भारताचा भाग बनला. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी हैदराबाद गॅझेटचं खूप महत्वं आहे. 1909 सालच्या हैदराबाद गॅझेटमध्ये औरंगाबाद विभागातील बारीकसारीक तपशीलाची नोंद आहे. मनोज जरांगेंचा मूळ जिल्हा आणि त्यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्र ठरलेल्या बीड (Beed District) जिल्ह्याची हैदराबाद गॅझेटमध्ये तपशीलवार नोंद करण्यात आली आहे.

Beed District: हैदराबाद गॅझेटमध्ये कसं आहे बीड?

बीड जिल्ह्याचा केज, अंबा, भिर, पाटोदा म्हणजे जवळपास अर्धा भाग बालाघाट तर गोदाकाठचे माजलगाव, गेवराई आणि बीड तालुक्यातील काही सखल भाग गंगथडी म्हणून प्रसिद्ध आहेत. 60-70 वर्षे आधी र्यंत जिल्ह्यात चांगलं जंगल होतं. या परिसरात कधी तरी वाघ दिसायचा
पण काळवीट, अस्वल, बिबट्या, रानडुक्कर, तरसं, लांडग्यांचा वावर नित्याचा होता. बीडचे जुने पांडवकालीन नाव दुर्गावती होते, त्यानंतर हे नाव बालनी झाले. राजा विक्रमादित्याच्या बहिणीने म्हणजे राणी चंपावतीने हे शहर जिंकले तेव्हा बीडचे नाव चंपावतीनगर ठेवले.

त्यानंतर हा परिसर आंध्रचे चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव यांच्या साम्राज्याचा भाग राहिला. चंपावतीनगरचं नाव कोणी बदललं कधी बदललं याचा उल्लेखही गॅझेटमध्ये करण्यात आला आहे. 1326 साली कुप्रसिद्ध मोहम्मद बिन तुघलकाने आपली राजधानी दिल्लीवरुन देवगिरीवर आणली. त्याकाळात तुघलकाने चंपावतीनगरचे नाव भिर /BHIR ठेवले. तुघलकाचा दात पडला त्या दातांच थडगं तुघलकाने शहराजवळच्या कर्जनीमध्ये बांधलं अशी दंतकथा आहे. तुघलकानंतर बीडवर बहामनी, निजामशाही आणि आदिलशाहीची सत्ता होती

1635 मध्ये बीड मुघलांनी ताब्यात घेतले आणि बीडवर दिल्ली सल्तनतची सत्ता आली, पण काही काळातच निजामाने बीड परत घेतले.
अठराव्या शतकाच्या सुरुवातीला बीड निजामशाही हैदराबाद संस्थानचा मुख्य भाग बनले. गॅझेटमध्ये अंबा तालुक्याचा उल्लेख आहे, तिथे जोगाई नावाच्या देवीचं मंदिर आहे.हे प्रसिद्ध ठिकाण आहे असं लिहिलंय, आता याला आपण अंबाजोगाई नावाने ओळखतो ते हेच ठिकाण. बीड जिल्हा छागल म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या चामडी पिशव्या आणि गुप्ती सारखं शस्त्र बनवण्यासाठी प्रसिद्ध असल्याची नोंद आहे. आणि आता याच नोंदींमुळे मनोज जरांगेंप्रमाणेच धनगर आणि कोळी समाज सुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेताना दिसत आहेत.

Beed Caste: बीडमधील जातीचं गणित

* १८८१ च्या जनगणनेनुसार बीडची लोकसंख्या ५ लाख ५८ हजार होती

* १८९१ च्या जनगणनेनुसार ६ लाख ४२ हजार

*  १८९९-१९०० साली मोठा दुष्काळ पडला होता, उपासमारीचा सामना करावा लागला

* त्यामुळे १९०१ साली लोकसंख्या ४ लाख ९२ हजार झाली

* म्हणजे त्या दुष्काळामुळे, उपासमारीमुळे जिल्ह्यात दीड लाख लोक मृत्यूमुखी पडले

* वार्षिक सरासरी पाऊसमान ३० इंच म्हणजे साधारण ७५० मिलीमीटर आहे.

* मात्र १८९९-१९०० साली सरासरीच्या ५० टक्केच पाऊस पडल्याची नोंद

* बीड जिल्ह्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोक हिंदू आहेत, त्यातले ८७ टक्के मराठी बोलतात

* 'मराठा-कुणबी' जातीची लोकसंख्या सर्वाधिक १ लाख ९६ हजार आहे,जी एकूण लोकसंख्येच्या ३९ टक्के आहे

* त्या खालोखाल शेती कसणाऱ्या जातीत बंजारा (३६ हजार)आणि कोळी (२६००) समाजाची लोकसंख्या असल्याचा उल्लेख

* महार ४२ हजार ३००

* धनगर २६ हजार

* मांग+चांभार २५ हजार ४००

* ब्राह्मण २१ हजार ६००

* माळी १२ हजार ७००

* वाणी ७ हजार

* मारवाडी ६ हजार

* ख्रिश्चन ९१

अशा आकडेवारीची हैदराबाद गॅझेटमध्ये नोंद आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री अहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री अहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत गर्जेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत गर्जेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
Bollywood Drug Case: शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
मोठी बातमी : शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati Ganesh Market : कोटींची मंडई,भाजी विक्रेत्यांचे हाल; रोखठोक बारामतीकारांशी संवाद
Bajrang Sonawane on Dhananjay Munde : खूप आठवण येत असेल तर भेटायला जा, धनंजय मुंडेंना सल्ला
Udhayanidhi Stalin on Language War: हिंदी लादली तर लँग्वेज वॉर पुकारु,त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत ध्वजारोहणाचा ऐतिहासिक सोहळा, मोदींच्या हस्ते राममंदिरावर Dhwajarohan
PM Modi Full Speech Ayodhya : शतकानुशतकाची जखम आज भरुन निघालीराम मंदिर ध्वजारोहणानंतर UNCUT भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री अहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री अहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत गर्जेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत गर्जेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
Bollywood Drug Case: शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
मोठी बातमी : शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
Uddhav Thackeray & Sanjay Raut: येसSSSS संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील, बंगल्याबाहेर पडताच उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
येसSSSS संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील, बंगल्याबाहेर पडताच उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
अंग भाजल्यानं रुग्णालयात दाखल, यातना असह्य झाल्यानं रुग्णाने इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, भंडाऱ्यात थरार
अंग भाजल्यानं रुग्णालयात दाखल, यातना असह्य झाल्यानं रुग्णाने इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, भंडाऱ्यात थरार
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचं काय होणार? आर्टिकल 231 ब काय सांगते; ओबीसी नेत्यानं स्पष्टच सांगितलं
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचं काय होणार? आर्टिकल 231 ब काय सांगते; ओबीसी नेत्यानं स्पष्टच सांगितलं
Mumbai News: मुंबई ते वाढवण फक्त 60 मिनिटांत, नवीन मार्ग कसा असणार? जाणून घ्या सविस्तर
मुंबई ते वाढवण फक्त 60 मिनिटांत, नवीन मार्ग कसा असणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget