बीड: बीड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पाण्याचे जवळपास दीड हजार नमुने तपासण्यात आले होते. यामध्ये २९२ नमुने दूषित आढळले आहेत. आरोग्य विभागाने तातडीने संबंधित गावांना पत्र देऊन काळजी घेण्याच्या सूचना केल्यात. ज्या गावांमध्ये उन्हाळ्यात 'ग्रीन' पाणी असते, त्याच गावांमध्ये पावसाळ्यात 'यलो' पाणी पाहायला मिळत आहे. बीडच्या जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रयोग शाळेत हे नमुने तपासण्यात आले. आरोग्य सहायक हे गावांमध्ये जाऊन गावात पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांची पाहणी करून पाण्याचे नमुने घेतात. त्यांची तपासणी प्रयोगशाळेत होते. त्यात दूषित असलेल्या गावांची यादी पुन्हा आरोग्य केंद्राला पाठविली जाते. तेथून ग्रामपंचायतीला पत्र देऊन योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. 


आरोग्य केंद्राकडून पत्र देऊन जलस्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून इतर स्वच्छता करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आल्यात. परंतु, ग्रामस्थांनीही पाणी उकळून घ्यावे. एक दिवस कोरडा पाळावा, परिसरात स्वच्छता ठेवावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.


आरोग्य सहायक हे गावांमध्ये जाऊन गावात पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांची पाहणी करून पाण्याचे नमुने घेतात. त्यांची तपासणी केली जाते. ऑगस्ट महिन्यात पाण्याचे जवळपास दीड हजार नमुने तपासण्यात आले होते. यामध्ये २९२ नमुने दूषित आढळले आहेत. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीला पत्र देऊन योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पावडर टाकून तपासणी करणार आहोत. त्यानंतर पुन्हा एकदा त्याची तपासणी करणार आहोत. पावसाळ्यात पाणी दूषित येत त्यामुळे पाण्याची तपासणी केली जाते आणि विशेष लक्ष्य दिले जाते. नागरिकांनी पाणी गाळून प्यावे असं आवाहन करण्यात येत आहे.