एक्स्प्लोर

Beed Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, माजलगावच्या पद्मावती नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळं माजलगावच्या पद्मावती नदीला पूर आला आहे. त्यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Beed Rain : बीड (Beed) जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून, वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील माजलगावच्या (Majalgaon) पद्मावती नदीला (Padmavati River) पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुराचं पाणी दगडी पुलावरून वाहत असल्याने दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळं अनेक नागरिक पुरामुळं अडकून पडले होते. 

वडवणीत मुसळधार पाऊस

राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी शेती पिकांना देखील या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. या पुरामुळं माजलगावच्या पद्मावती नदीला पूर आला आहे. त्यामुळ अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर तिकडे वडवणी तालुक्यात देखील मुसळधार पाऊस झाल्याने लऊळ येथील नदीला पूर आला आहे. त्यामुळं नागरिकांना नदीच्या पाण्यातून आपली वाट काढावी लागत आहे. गुडगाभर पाण्यातून या नागरिक आपला जीव मुठीत घालून नदीवरच्या पुलावरुन वाट काढत आहेत.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार हजेरी

राज्याच्या विविध भागात पुन्हा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह, ठाणे नवी मुंबई, पालघर या परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे पुणे, नागपूर कोकणातील रायगड, सिंधुदुर्गमध्येही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही (8 सप्टेंबर) राज्यात कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आजपासून  राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, पालघर आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गेली काही दिवस पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. 

प्रशासन मार्फत तयार केलेला गुजरवाडी-पात्रुड रस्त्यावरील पूल रात्री पडलेल्या पावसात वाहून गेला आहे. त्यामुळं गावकऱ्यांचा तालुक्याचा संपर्क तुटला आहे. त्यामुळं अनेक विद्यार्थी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाता येत नाही. प्रशासनाकडून पुलाबाबत काही मदत करावी, अशी आशा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
Beed Accident News: भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
धक्कादायक! स्पा सेंटरच्या नावाखाली आक्षेपार्ह प्रकार सुरु, महिलांसह पुरुषांना घेतलं ताब्यात, एकाच वेळी सात ठिकाणी कारवाई, बीड शहरात खळबळ
धक्कादायक! स्पा सेंटरच्या नावाखाली आक्षेपार्ह प्रकार सुरु, महिलांसह पुरुषांना घेतलं ताब्यात, एकाच वेळी सात ठिकाणी कारवाई, बीड शहरात खळबळ
Beed Drought: दुष्काळाच्या आढावा बैठकीस अनुपस्थित राहणं भोवलं, बीड जिल्हाधिकाऱ्यांनी केजच्या तहसीलदारांचा पदभार काढला
दुष्काळाच्या आढावा बैठकीस अनुपस्थित राहणं भोवलं, बीड जिल्हाधिकाऱ्यांनी केजच्या तहसीलदारांचा पदभार काढला

व्हिडीओ

CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report
ECI on SIR : निवडणूक आयोगाची 20 राज्यांमध्ये पुन्हा मोहिम Special Report
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Pune Lohagad Case Siya Goyal: कडेवर उभे केले, सियाने मागून अँगल तपासले; केतनचा लोहगडावरील फोटो समोर, मोबाईल चॅटमधून थरकाप उडवणारी माहिती
कडेवर उभे केले, सियाने मागून अँगल तपासले; केतनचा लोहगडावरील फोटो समोर, मोबाईल चॅटमधून थरकाप उडवणारी माहिती
Sharad Pawar: पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्याची तारीख बदलली; शरद पवारांनी सांगितलं विमानतळावर पोहचण्यापासून ते निघेपर्यंतचं संपूर्ण शेड्यूल, मोदींसह 'या' मंडळींनाही दिलं आमंत्रण
पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्याची तारीख बदलली; शरद पवारांनी सांगितलं विमानतळावर पोहचण्यापासून ते निघेपर्यंतचं संपूर्ण शेड्यूल, मोदींसह 'या' मंडळींनाही दिलं आमंत्रण
भय्या माने हसन मुश्रीफांची साथ सोडताना भावूक; म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत पुणे पदवीधर लढणार, तिकडं कट्टर शिलेदाराने साथ सोडताच मुश्रीफ म्हणाले, भय्या माने आणि आमचा संबंध संपला
भय्या माने हसन मुश्रीफांची साथ सोडताना भावूक; म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत पुणे पदवीधर लढणार, तिकडं कट्टर शिलेदाराने साथ सोडताच मुश्रीफ म्हणाले, भय्या माने आणि आमचा संबंध संपला
Jalgaon Crime News: ग्रामसभेत प्रश्न विचारला अन् माजी सरपंच संतापले, तरुणाला मारहाण केली अन्...; जळगावात नेमकं काय घडलं?
ग्रामसभेत प्रश्न विचारला अन् माजी सरपंच संतापले, तरुणाला मारहाण केली अन्...; जळगावात नेमकं काय घडलं?
Nushrratt Bharuccha Health Update: नुसरत भरूचा एअर ॲम्ब्युलन्सनं बालीहून मुंबईत दाखल; ऑक्सिजन सपोर्टवर दिसली, चाहत्यांची चिंता वाढली VIDEO
नुसरत भरूचा एअर ॲम्ब्युलन्सनं बालीहून मुंबईत दाखल; ऑक्सिजन सपोर्टवर दिसली, चाहत्यांची चिंता वाढली VIDEO
Raigad Diveagar beach Tragedy : पोलीस ठाण्यात सुरु होती मीटिंग; अचानक फोन वाजला, दिवेआगरमध्ये 8 मुलांच्या मृत्यूची बातमी समजताच नावांची यादी उघडली, मुलाचं नाव पाहिलं अन्...
पोलीस ठाण्यात सुरु होती मीटिंग; अचानक फोन वाजला, दिवेआगरमध्ये 8 मुलांच्या मृत्यूची बातमी समजताच नावांची यादी उघडली, मुलाचं नाव पाहिलं अन्...
MVA: विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने परस्पर नावं केली जाहीर; विचारात न घेता नावे जाहीर केलीच कशी? मित्र पक्षांची नाराजी, तातडीच्या बैठकीचं आयोजन
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने परस्पर नावं केली जाहीर; विचारात न घेता नावे जाहीर केलीच कशी? मित्र पक्षांची नाराजी, तातडीच्या बैठकीचं आयोजन
Fly dubai Incident Marathi News: ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड
ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड
Embed widget