बीड : केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याप्रकरणी बीडच्या वैद्यनाथ कारखान्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या राजकारणातून आणि संघर्षातून मार्ग काढेन, चुकीच्या गोष्टी करणार नाही असं सांगत त्या आक्रमक झाल्याचं दिसून आलं. आपण लोकसाठी राजकारण करत आहे आणि ते करत राहणार असंही त्या म्हणाल्या.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) आज जीएटी विभागाने कारवाई करत 19 कोटींची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, संघर्षातून मार्ग काढेन. बाकीच्या कारखान्यांना मदत मिळते, माझ्या कारखान्याला मिळाली नाही. जीएसटी विभागाची दोन तीन महिन्यांपूर्वी देखील नोटीस आली होती. आता परत आली आहे. तो उद्योग सध्या नुकसानीत आहे.
भाजपमधून डावलले जात आहे का? असं विचारल्यानंतर मी यावर काही सांगू शकत नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, "मुंडे साहेबांनी कारखाना हालाखीत उभा केला. कोविडमध्ये नाकातोंडात पाणी गेले, तेव्हा बँकेकडे गेले. माझ्या राजकारणातून संघर्षातून मार्ग काढेन. चुकीच्या गोष्टी करणार नाही. मी लोकासाठी राजकारण करत आहे. ते करत राहणार. मी फक्त संघर्षकन्या नाही तर सहनशीलता कन्या आहे."
19 कोटींची मालमत्ता जप्त
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) मोठी कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने एप्रिल महिन्यात देखील छापेमारीची कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने बेकायदेशीररित्या 19 कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याचे स्पष्ट झाले होते. केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याची चौकशी सुरु होती.
एप्रिल महिन्यातही छापा
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या आयुक्त कार्यालयाच्या पथकाने नोटिसा बजावल्या होत्या. पण या नोटिशींना प्रत्युत्तर न दिल्याने एप्रिल महिन्यात छापा टाकून काही कागदपत्रे हस्तगत केली होती. जीएसटी वेळेवर न भरल्याने ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान आर्थिक देवाणघेवआर आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली होती.
ही बातमी वाचा: